पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४६९ प्रस्तावो । तरि हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥ ८७ ॥ कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलिया देइजे। ना तरी आर्तातं स्पर्शिजे | अळुमाळु ॥ ८८ ॥ हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें । नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥ ८९ ॥ पावोनि तो स्पर्श । मळ्यानिळु खरपुस । येणें मानें पशु | कुरवाळणें ॥ २९० ॥ जे सदा रिते मोकळे । जैशीं चंदनांगे निसळें । न फळतांही निर्फळें । होतीचि ना ॥ ९१ ॥ आतां असो हैं वाग्जाळ । जाणें तें करतळ । सज्जनांचें शीळ | स्वभाव जैसे ॥ ९२ ॥ आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें । तरी सांगितले कोणाचे । विलास हे ॥ ९३ ॥ काइ शाखा नव्हे तरु | जळेंवीण असे सागरु । तेज आणि तेजाकारु । आन काई ॥ ९४ ॥ अवयव आणि शरीर । हे वेगळाले काय कीर । कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी ॥ ९५ ॥ म्हणोनि हे जे सर्व । सांगितले बाह्यभाव । तें मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥ ९६ ॥ जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रूख जाहलें । तैसें इंद्रियद्वारीं फांकलें । अंतरचि कीं ॥ ९७ ॥ पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी केंची बाहेरी । वोसंडेल ॥९८॥ असतो. परंतु असें असतांही यदाकदाचित् कार्याचा उपक्रम करण्याचा प्रसंग आलाच, तर ते आपल्या हातांना पुढें सांगितल्याप्रमाणेंच वर्तण्याची संवय लावतात. ८७ एकाद्याला अभय देण्याकरितांच त्यानीं वर व्हावें; जो पडला असेल, त्याला आधार द्यावयाला पुढें व्हावें; जो दुःखी असेल त्याला अत्यंत कोमलपणाने गोंजारावं. ८८ हेंही नाइलाज म्हणूनच करावयाचें; परंतु दुःखिताचें भय हरण करण्यांत त्याचा जो शीतळपणाचा जिव्हाळा अनुभवास येतो, तो चंद्रकिरणांतही आढळत नाहीं. ८९ ते हात पशूलाही अशा प्रेमानें कुरवाळतात, कीं त्यांचा स्पर्श म्हणजे जणूं काय तो सुगंध शीतल मलयवायूचाच स्पर्श ! २९० ते हात नेहमींच निर्लेप व मोकळे असतात आणि चंदनाच्या शीतळ फांद्यांप्रमाणे फळ न येतांही ते कधीं निष्फळ होत नाहींत; कारण त्यांचा शीतळपणा - प्रेमळपणा-हा बहुमोलाचा, अक्षय व सर्वव्यापी असतो. ९९ आतां हा शब्दविस्तार पुरे झाला. अर्जुना, इतकें समज कीं, त्याचा तळहात साधुसंतांच्या शुद्धशीतळ शीलाप्रमाणे असतो. ९२ आतां अशा पुरुषाच्या मनाचें वर्णन करावयाचें; पण इतका वेळ ज्या आचारविलासाचें मी वर्णन केलें, तें त्याच्या मनाचेंच नव्हे का? ९३ फांद्या म्हणजे झाडच नव्हे का? पाण्यावांचून समुद्र कोठें असतो का ? तेज आणि तेजस्वी पदार्थ हीं कधीं निरनिराळी असतात का ? ९४ अवयव आणि शरीर, किंवा रस आणि पाणी, हीं कधीं पृथक्पृथक राहू शकतात का ? ९५ म्हणून आतांपर्यंत जे बाह्य आचारप्रकार सांगितले, तें या अवयवांनी युक्त असें मनच समज. ९६ बाहेर प्रकट होते; तसे इन्द्रियांच्या द्वारे अंतरंगांतील मनच बाहेर प्रकट होतें, असें जाण. ९७ कारण, जर मनांतच अहिंसेची वाण असेल, तर मग ती बाहेर कोठून उतूं जाऊन प्रकट होणार ? ९८ १ नाइलाज म्हणून. २ शीतळ. ३ अडचण, तोटा, तुटवडा. जेंवीं जमिनींत पेरावें, तेंच वृक्षरूपानें