पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दिठी घाली ॥ ७५ ॥ तरि चंद्रविवौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥ ७६ ॥ तैसें प्राणियांसि होये । जरी तो कहीं वासु पाहे । तया अवलोकनाची सोये । कूमही नेणे ॥ ७७ ॥ किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥ ७८ ॥ तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥ ७९ ॥ अक्षमें आणि संन्यासिलें । कां निरिंधन आणि विझालें । मुकेनि घेतलें । मौन जैसें ॥ २८० ॥ तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं । जे अकर्तयाच्या ठायीं । वैसों येती ॥ ८१ ॥ आसुडैल वारा । नख लागेल अंबरा | इया बुद्धी करां । चळों नेदी ॥ ८२ ॥ तेथ आंगावरिलीं उडवावीं । कांडोळां रिगतें झाडावीं । पशुपक्ष्यां दावावी । त्रासमुद्रा ॥ ८३ ॥ इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचें किरीटी | बोलणें कें ॥८४॥ लीलाकमळें खेळणें । कां पुष्पमाळा झेलणें । न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ।। ८५ । हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी । नखांचीं गुंडाळीं । बोटांवरी ॥ ८६ ॥ तंव करणेयाचाचि अभावो । परि ऐसाही पडे एकादे वेळी टाकली, ७५ तर, जशी चंद्रत्रिंत्रांतून निघणारी अमृतधारा दिसली नाहीं, तरी चकोरांचीं एकदम पोटें भरून त्यांना समाधान होतें, ७६ तसें सर्व जीवांना त्या कृपादृष्टीनें होतें. कांसवीची प्रेमळपणाविषयीं प्रसिद्धी आहे. परंतु या सत्पुरुषाच्या दृष्टीची योग्यता त्या कांसर्वाच्याही दृष्टीला येत नाहीं. ७७ सारांश, सर्व भूतमात्रासंबंधें ज्यांची अशी दृष्टि झाली आहे, त्यांचे हातही त्याच कोटींतले असतात. ७८ कृतार्थ झाल्यामुळे जसे सिद्धपुरुषांचे सर्व मनोरथ जागचे जागीं शांत होऊन राहातात, तसेच ज्याचे हात स्वस्थ, निष्क्रिय असतात; ७९ आधींच कार्य करण्यास असमर्थ आणि त्यांत घेतला संन्यास, किंवा आधींच जळवणाचें नांव नाहीं आणि त्यांत विस्तवही विझलेला असावा, किंवा आधींच मूळचा मुका आणि त्यांत त्यानें मौनाचें व्रत धरावें. २८० त्याचप्रमाणे ज्या हातांना कांहींच करणें उरत नाहीं, कारण ते व्यापारशून्य, अगदीं निष्क्रिय, अशा पुरुषाच्या शरीराला डकलेले असतात. ८१ वायला हिसका बसेल, पोकळीला नख रुपेल, या भीतीनें तो हातांना हालूंही देत नाहीं. ८२ मग अंगावर बसलेल्या माशीला टिचकीनें उडवावी, किंवा डोळ्यांत शिरणाऱ्या कंबराला झाडावें, किंवा कोणाही पशुपक्ष्याला भेडसवावं, ८३ इत्यादि गोष्टी तो करीत नाहीं, हें सांगणेंच नको. दंडुका किंवा काठीही जो घेत नाहीं, तो शस्त्राला शिवत नाहीं हें बोलण्याची, अर्जुना कांहींच आवश्यकता नाहीं. ८४ गिरगिरवणं किंवा पुष्पमाळा उडवून झेलणे, असे खेळही तो करीत नाहीं, कारण, न जाणों त्या कमलाची किंवा पुष्पमालंची गोफणगुंडी होऊन कोणास लागेल ! ८५ अंगावरचे केस कुसमडतील, म्हणून तो आपलें आंगही कुरवाळीत नाहीं, आणि, नखें न काढतां, त्यांची गुंडाळीं खुशाल बोटांवर वाढू देतो ! ८६ अशा प्रकारें या पुरुषाच्या बाबतींत कार्याचा केवळ अभाव कमळ