पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४६७ । बोलों म्हणे जरी कांहीं । तरि बोल कोणाही । खुपेल कां ॥ ६४ ॥ बोलतां अधिकही निघे । तरि कोण्हाही वर्मी न लगे । आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं ॥ ६५ ॥ मांडिली गोठी हन मोडेल । वासिपैल कोणी उडेल । आइकोनि वोवांडिल । कोण्ही जरी ॥ ६६ ॥ तरि दवाळी कोणा नोहावी । भंवई कवणाची नुचलावी । ऐसा भावो जीवीं । म्हणोनि उगा ॥ ६७ ॥ मग प्रार्थिला विपायें । जरि लोगें बोलों जाये । तरि परिसतया होये । मायापु ॥ ६८ ॥ कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असळलें । पतिव्रते आलें । वार्धक्य जैसें ॥ ६९ ॥ तैसे साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे ॥ २७० ॥ विरोधु वादुवळु । प्राणितापढाळु । उपहासु छळु । वर्मस्पर्शु ॥ ७१ ॥ आटु वेगु विंदाणु | आशा शंका प्रतारण । हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा ॥ ७२ ॥ आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी | सांडिलिया भृकुटी । मोकळिया ॥ ७३ ॥ कां जे भूतीं वस्तु आहे । तिये रुपों शके विपायें । म्हणोनि वासु न पाहे । बहुतकरुनी ||७४ | ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि वळें । उघडोनियां डोळे | बोलण्याचें त्यानें मनांत आणलेच, तर त्याचे शब्द इतके मऊ असतात, कीं ते कधींही कोणालाही खुपत नाहींत. ६४ बोलूं लागला म्हणजे एकादे वेळीं पुष्कळही बोलतो, पण तें कोणाच्याही जिव्हाळीला झोंबत नाहीं, आणि त्याची कोणालाही भीति वाटत नाहीं. ६५ न जाणों आपल्या बोलण्यानं, कदाचित् चांगली बस बसलेली गोष्ट बिघडेल, किंवा कोणाला भीति वाटेल, कोणी केल, किंवा कोणी आपल्या शब्दाचा तिरस्कारानें अपमान करील, ६६ तेव्हां असें कांहीं घडूं नये, कोणालाही क्लेश होऊं नयेत, कोणाचीही मुंबई वांकडी होऊं नये, असें मनांत आणून, तो बहुशः कांहींच बोलत नाहीं. ६७ मग कोणी फारच गळ घातली, म्हणून, जर कदाचित् तो भिडेनें बोलूं लागला, तर श्रोत्याला असेंच वाटतें कीं जसा काय आपला मायबापच बोलत आहे ! ६८ जणूं काय नादब्रह्मच प्रत्यक्ष अवतरलें, किंवा गंगाजल संथपणें आलें, किंवा पतिव्रतेला वृद्धपण जडलें, असें तें बोलणें शुद्ध व कोमळ असतें. त्याचे ते मोजके आणि गोड शब्द अमृताच्या तरंगांप्रमाणे वाटतात ६९, २७० उलटा कोटिक्रम, हटवाद, जीवाला संताप आणणारा कठोरपणा, चेष्टा, छळवाद, वर्माला झोंबेल असा शब्द, आडवणूक, चिडखोरपणा, खंबटपणा, आशा दाखवणे, कुशंका घेणें, लवाडीचे बोलणे, हे दुर्गुण त्याच्या वाणीनें सर्वस्वीं टाकलेले असतात. ७१, ७२ आणि अर्जुना, त्याचप्रमाणे त्याच्या दृष्टीची ठेवण अशी असते, कीं, त्याच्या भुवया अगदी मोकळ्या सोडलेल्या दिसतात म्हणजे त्यांना आठ्या पडलेल्या नसतात, ७३ याचें कारण असें कीं, प्रत्येक भूतमात्रांत परब्रह्मवस्तु आहे, तेव्हां त्याला आपली नजर कदाचित् डंवचील, म्हणून तो बहुशः कोणाकडे रोखून पहात नाहीं. ७४ पण, अशी नेहमींची वृत्ति असतां, जर त्यानं हृदयांत उसळणाऱ्या कृपेच्या बळानें प्रसन्न झालेली दृष्टि, डोळे उघडून, कोणाकडे १ मूर्तिमंत.