पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अर्जुना । हैं अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥ ५१ ॥ पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ दांतांचे आगरडे | लागती जैसे ॥। ५२ ॥ कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे । तिये दिठी आहे | हळुवार जें ॥ ५३ ॥ नाना कमळदळें । डोलविजती ढाळें । तो जेणें पाडें बुबुळें । वारा घे ॥५४॥ तैसेनि मार्दवें पाय| भूमीवरी न्यसीतु जाय । लागती तेथ होय । जीवां सुख ॥ ५५ ॥ ऐसिया लघिमा चालतां । कृमिकीटक पांडुसुता । देखे तरी माघौता | हळूच निघे ॥ ५६ ॥ म्हणे पावो धडकडील | तरि स्वामीची निद्रा मोडेल | रचलेपणा पॅडेल । झोती हन ॥ ५७ ॥ इया काकुळती । वाहणी माघ । कोणेही व्यक्ती । न वचे वरी ॥ ५८ ॥ जीवाचेनि नांवें । तृणातेंही नोलांडावे । मग न लेखितां जावें । हे के गोठी ॥ ५९ ॥ मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे । तैसें भेटलियां न करवे । अतिक्रमु ॥ २६० ॥ ऐसी जयाची चाली । कृपाफुली फळा आली । देखसी जियाली । दया वाचे ॥ ६१ ॥ स्वयें श्वसणेंचि तें सकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे ॥ ६२ ॥ पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें । शब्द पाठीं अवतरे | कृपा आधीं ॥ ६३ ॥ तंव बोलणेंचि नाहीं । काळजीपूर्वक जें चालणें, अर्जुना, त्याचें शब्दानें वर्णनच होत नाहीं, त्याला कोणतेंच माप पुरें पडत नाहीं ! ५१ प्रेमाच्या भरानें मांजरी आपल्या पोरांना तोंडांत धरते, तेव्हां तिच्या दांतांचीं टोकें जितपत बचत असतील, ५२ किंवा ममताळू आई आपल्या तान्हुल्याची वाट पहात असतां तिच्या लाजतपत कोमलपणा येतो, ५३ किंवा कमलाचे पान हालविलें असतां त्याचा वारा जितपत डोळ्यांना झोंबत असेल, ५४ तितपत मृदुपणानं पाय जमिनीवर पडत जातात; ते जेथें लागतात, तेथे असलेल्या जीवांना सुखच होते. ५५ अर्जुना, असा अलगत हळुवार पाय पडत असतांना जर त्याला कृमिकीटक दिसला, तर तो हळूच मागें सरतो. ५६ तो पाय जणूं काय म्हणतो, 'मी दणदणत चाललों तर स्वामीची आत्मसमाधि मोडेल; त्याच्या स्थिर प्रकृतीस धक्का बसेल, ५७ या चिंतेनें तो पायवाटेवरून माघारा सरतो, पण कोणाही जीवाला दडपून टाकीत नाहीं. ५८ जीव म्हणून गवतालाही चेंगरू नये, इतकी जेथें काळजी आहे, तेथें मग निष्काळजीपणानें पाऊल पडण्याची गोष्टच कशाला हवी ? ५९ मुंगीला जसा मेरुपर्वत ओलांडवत नाहीं, किंवा माशीला जसा सागर तरून जाववत नाहीं, तसा वाटेंत भेटलेल्या जीवाला पायाला लाथाडतां येत नाहीं ; २६० असें ज्याचं चालणं कृपेनें फुलून फळाला आलें आहे, त्याच्या वाणींत मूर्तिमंत दया जीवंत नांदत आहे, असें तुला दिसेल. ६१ त्याचा श्वासही अगदी हळू, कोमल असतो. त्याची मुद्रा प्रेमाचें माहेरघर असते. त्याचे दांत म्हणजे माधुर्याचे कोंबच ! ६२ अरे स्नेहाचा पाझर पुढें, आणि त्याच्या मागून अशा मनुष्याने उच्चारलेली अक्षरें जात असतात; कृपा आधीं, मग तांडचा शब्द, अशी त्याची रीत असते. ६३ साधारणतः तो कांहींच बोलत नाहीं, पण कांहीं १ मांजरी, २ टोकें,