पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४६५ भावो ॥ ३९ ॥ बहुतकरूनि किरीटी | हाचि विपयो इये गोठी । एन्हवी कां आडवाटीं । धांविजैल ॥ २४० ॥ आणि स्वमताचिया निर्धारा । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां मतांतरां । निर्वचु कीजे ॥ ४१ ॥ ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी । आतां ययावरी । मुख्य जें गा ॥ ४२ ॥ तें स्वमत बोलिजैल | अहिंसे रूप कीजैल । जिया उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥ ४३ ॥ परि ते अधिष्ठिनि आंगें | जाणिजे आचरतेनि वोगें । जैसी कसवटी सांगे । वाँनियातें ॥४४॥ तैसें ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेंचि अहिंसेचें चिंब उठी । तेंचि ऐसें किरीटी । परिस आतां ॥ ४५ ॥ तरि तरंगु नोलांडित । लहरी पायें न फोडितु । सांचल न मोडतु । पाणियाचा ॥ ४६ ॥ वेगें आणि लेसौं । दिठी घालून विसों । जळीं वकु जैसा । पाउल सुये ॥ ४७ ॥ कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार | कुंचबैल केसर | इया शंका ||४८|| तैसे परमाणु पां गुंतले | जाणूनि जीव सानुले । कारुण्यामाजी पाउलें | लपवूनि चाले ॥ ४९ ॥ ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेहभरितु | जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥ २५० ॥ ऐसिया जतना । चालणें जा आहे, आणि त्याच दृष्टीनें तें तूं समजून घ्यावें, असा आमचा अभिप्राय आहे. ३९ शिवाय अर्जुना, अहिंसाविषयाचा वरील गोष्टीशीं मुख्यत्वेकरून संबंध आहे; तसें नसतें तर आम्हीं मुद्दाम आडवाटेला जाऊन कशाला पाल्हाळ केला असता ? २४० आणखी एक गोष्ट अशी आहे, कीं, अर्जुना, आपल्या स्वतःच्या मताचा नीट निर्वाळा करण्यासाठीही पुढे आलेल्या अन्य मतांची यथास्थित फोड करणें अवश्यच असतें. ४९ तेव्हां आतांपर्यंत जें निरूपण केलें, त्याचें असें कारण आहे. - आतां, आमचे स्वतःचें जें मत आहे, तें यानंतर प्रतिपादितों. जी अहिंसा बाणली असतां, अंतरींचें ज्ञान व्यक्त होतें, त्या अहिंसेचें स्वरूप आतां स्पष्ट करण्यांत येईल. ४२, ४३ पण ती अहिंसा अंगी बाणली आहे कीं नाहीं, हें वर्तनावरून कळते. ज्याप्रमाणें सोन्याचा कस कसोटीवर उमटतो, ४४ त्याप्रमाणे ज्ञानाची आणि मनाची गांठ पडली, कीं लागलीच अहिंसा उदय पावते; हें कसें घडतें तें ऐक. ४५ तरंगाला न ढवळतां, लहरीला न फोडतां, पाण्याचा सांठा न चाळवतां, ४६ वेगानें व नाजूक हळुवारपणानें आमिषाकडे म्हणजे माशाकडे नजर रोखून बगळा, जसा वातावेताने पाण्यांत पाऊल ठेवतो; ४७ किंवा भ्रमर जसा कमलपराग चुरडतील या भीतीनें कमलावर अगदी अलगत पाय ठेवतो; ४८ त्याप्रमाणें प्रत्येक परमाणूला लहान लहान जीव चिकटलेले असतात, हें मनांत आणून, आपले पाऊल करुणेनें गुंडाळून, हलकें करून चालणें; ४९ त्याच वांटने कृपेला चालवणें, ती दिशा दयाप्रेमाने भरून टाकणे, दुसऱ्या जीवाच्या रक्षणाकरितां आपला स्वतःचा जीव अर्पण करण्यास सज्ज होणें, २५० अशा प्रकारें सदय अंतःकरणानें १ रीतीनें मार्गाने. २ सोन्याच्या कसाला ३ नाजूकपणानें. ४ आमिषाला, भक्ष्याला. ५ कुस्करेल, ५९