पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी काढविली । एके गर्भिणीं उकडविलीं । पुटामाजीं ॥ २८ ॥ अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरां । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥ २९ ॥ आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त । मग राखिले शिणत । आणीक जीव ॥ २३० ॥ अहो वसतीं धवळारें । मोइन केली देव्हारें । नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ॥ ३१ ॥ मस्तक पांधुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें । घर मोडोनि केले | मांडव पुढें ॥ ३२ ॥ नाना पांघरणें । जाळूनि जैसें तापणें । कां जालें आंगधुणें । कुंजराचें ॥ ३३ ॥ ना तरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि वांधिजे गांठीं । इया करणी की चेष्टा । काइ हंसों ॥ ३४ ॥ एकीं धर्माचिया वाहणी । गाळं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणी । जीव मेले ॥ ३५ ॥ एक न पचविती कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा || ३६ || एवं हिंसाचि अहिंसा | कर्मकांडी हा ऐसा | सिद्धांतु सुमनसा | वोळखें तूं || ३७ || पहिलें अहिंसेचें नांव । आम्ही केलें जंव । तंव स्फूर्ति वांधली हांव । इये मती ॥ ३८ ॥ तरि कैसेनि ययातें गाळावें । म्हणोनि पडिलें वोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा मोडवल्या, कोणा एका वृक्षाची साल सोलून काढवली, आणि कांहींचे गाभे भांड्यांत उकळवले, २८ जन्मापासून जे कोणाशींही वैर करीत नाहींत, अशा वृक्षांना, त्यांचा चीक काढण्याकरितां, त्यांच्या सर्वागावर चिरा पाडवल्या; अर्जुना, अशा प्रकारें वृक्षांचे जीव घेऊन रोग्यांना रोगमुक्त करण्यांत येतं. २९ आणि जंगमांना म्हणजे सजीव प्राण्यांनाही चिरून, त्यांच्या शरीरांतील पित्तादि पदार्थ काढून त्याचे औषध देऊनही कांहीं रोगानें शिणणारे जीव वांचविण्यांत येतात. २३० अहो, राहते चुनेगच्ची वाडे मोडून त्यांचीं देवळें करावीं, व्यवहारांत गरीबांना नागवून अन्नछत्रे घालावीं, ३१ डोकें झांकून ढुंगण उघडे टाकावें, घर मोडून मांडव उभारावे, ३२ किंवा पांघरुणें जाहून त्या जाळाशी शेकत बसावें, किंवा हत्तीला अंगधुणं घालावें ३३ किंवा बैल विकून गोठा बांधावा, अथवा पोपटाला सोडून देऊन पिंजरा करावा, हें काय करणं म्हणावें कीं चेष्टा म्हणावी ! अशीं कृत्यें पाहून हंसावें तरी किती ? ३४ कोणी पुण्यकृत्याचा मार्ग म्हणून पाणी गाळून घेतात, पण त्या गाळण्याच्या दडपर्णानंच कित्येक जीवांचा घात होतो ! ३५ कोणी हिंसेच्या भयानें अन्नाचा कणसुद्धां भक्षण करीत नाहीं, पण उपासमारीनें जीव खंगून कासावीस होतात, ही हिंसाच आहे ! ३६ तेव्हां, भल्या अर्जुना, 'हिंसा म्हणजे अहिंसा' हा जो कर्मकांडांत सिद्धान्त आहे, तो अशा धोरणाचा आहे, हे ध्यानीं घे. ३७ आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेचें नांव काढलें, तेव्हांच या मताचे स्वरूप स्पष्ट करावं, अशी साहजिक स्फूर्ति झाली; ३८ तेव्हां वाटलें कीं हें मत सहज सुचलें आहे. मग त्याचे स्पष्टीकरण करण्याचे कशाला चुकवावें, असें मनांत आणून आम्हीं हें कथन १ चिरा, भेगा. २ अन्नछत्र ३ पिंजरा.