पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला २१ अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेहनवल ॥ ९९ ॥ जेणें संग्रामी हरु जिंतिला । निवातकवचांचा ठोवो फेडिली । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥ २०० ॥ जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजीं सांपडे । कोवळिये ॥ १ ॥ तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणे । तैसें कठिण कोंवळेपणें । स्नेह देखा ॥ २॥ हे आदिपुरुपाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणऊनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥ ३ ॥ अवधारीं मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥ ४ ॥ कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता । मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥ ५ ॥ माझें अतिशयें मन व्याकुळ । होतसे वाचा वरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥ ६ ॥ निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव । न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ ३१ ॥ सम..- देखतां मी निमित्तेंही विपरीतचि केशवा । न कल्याणहि मी देखें युद्ध स्वजन मारुनी ॥ ३१ ॥ आर्या- युद्ध विपरीतासच पाहतसें केशवा निमित्तानें । वधुनि स्वजना न दिसे मातें कल्याण राज्यमत्तार्ते३१ ओवी - आपले स्वजन म्यां मारुनी । मज सुख व्हावें, नुपजे मनीं । विपरीत चिन्हें दिसती नयनीं । केशवराया पैं मज या कौरवां जरी धावें । तरी युधिष्ठिरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥ ७ ॥ म्हणोनि जळो हैं झुंज । प्रत्यया नये मज । एणें काय काज | महापापें ॥ ८ ॥ देवा बहुतां परी पाहतां । एथ वोखटें होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥ ९ ॥ परंतु या स्नेहमोहाचें अद्भुत सामर्थ्य त्या गांडीवापेक्षांही वरचढ ठरले. ९९ ज्याने युद्धांत शंकराला हार आणली, ज्याने निवातकवचनामक असुरांचें निर्मूळ करून टाकिलें, त्या अर्जुनालाही या मोहानें एका क्षणांत व्यापून सोडलें ! २०० ज्याप्रमाणे भुंगा कोणतेंही वाटलेले कठीण लांकूड सहज फोडतो, परंतु कोमल कमळाच्या कळींत कोंडला जातो, १ आणि मग प्राण जातो असें झालें तरीही त्या कमळाच्या पाकळीचा भेद त्याला करितां येत नाहीं, त्याप्रमाणेंच या स्नेहवृत्तीला कोमलपणानेंच कठिणपणा येत असतो. २ ही वृत्ति म्हणजे आदिनारायणाची माया होय, हिला ब्रह्मदेवसुद्धां आकलं शकत नाहीं; म्हणून, हे राजा धृतराष्ट्रा, तिला अर्जुनाला भुलवितां आलें. असें संजय बोलला. ३ पुढें संजय म्हणतो- राजा, श्रवण कर. यानंतर तो अर्जुन, आपला सर्व गोतवळा पाहून, युद्धाविषयींचा आपला अभिमान टाकिता झाला. ४ त्याच्या मनांत हा दयेचा संचार कसा झाला, हें कांहीं सांगतां येत नाहीं. यानंतर तो श्रीकृष्णांस म्हणाला, “ आपण येथें राहणें वरें नाहीं. ५ माझं अन्तःकरण फार व्याकुळ झालं आहे; ' आम्ही या सर्वाना मारावें, ' या गोष्टीच्या कल्पनेनें धड शब्दही माझ्या तोंडांतून निघेनासा झाला आहे. ६ जर कौरवांना आम्हीं मारावं, तर मग धर्मादिकांनाही कां मारूं नये ? हे दोन्ही आमचे गोत्रजच नाहीत का ? ७ म्हणून आग लागो या युद्धाला ! हे भयंकर पाप आचरल्यावांचून आमचें काय अडले आहे, तेंच मला समजत नाहीं. ८ देवा, अनेक परींनी विचार करितां, मला असें वाटतें कीं, येथे युद्ध करणें हें अनुचित होईल, किंबहुना, हें युद्ध चुकविले तरच कांहीं हित साधलें तर साधेल. ९ १ नविगांव पुसून टाकलें. २ या कारणानें,