पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४६३ जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढे ।। १६ ।। पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हैं जाण । आतां आईक खूण । अहिंसेची || १७ | तरि अहिंसा वहती परी | बोलिली असे अवधारी । आपुलालिया मतांतरीं । निरूपिली || १८॥ परि ते ऐसी देखा । जैशा खांडुनियां शाखा । मग तयाचिया बुडुखा । कुंप कीजे ॥ १९ ॥ कां बाहु तोडोनि पचविजे । मग भुकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोहनि कीजे । पौळी देवा ॥ २२० ॥ तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निण केला ॥ २१ ॥ जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणोनि पर्जन्येष्टि करावे । नाना याग ॥ २२ ॥ तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥ २३ ॥ पेरिजे नुसधी हिंसा | तेथ उगवेल काय अहिंसा | परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥ २४ ॥ आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवधातु ।। २५ ।। नानारोगें आहाळलीं । लोळती भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥ २६ ॥ तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळ सपत्रीं ॥ २७ ॥ एक आड मोडविली । अजंगमांची खाल त्याच्या मुठींत ज्ञान आलें आहे, असें जाणावें. १६ हें अभपणाचें कथन झालें. आतां 'अहिंसा' म्हणजे काय, तें ऐक. १७ आधीं हें लक्षांत ठेव कीं अहिंसेची व्याख्या नानाप्रकारांनी करण्यांत येते. ज्यांनीं त्यांनीं आपापल्या मतानुसार तिचें वर्णन केलेले आहे. १८ परंतु त्या वर्णनांत इतका विक्षिप्तपणा आहे, कीं, जशा फांद्या तोडून झाडाच्या भुंड्या बुंध्याभोंवतीं त्यांचे कुंपण घालावें, १९ किंवा हात तोडून शिजवावा आणि त्यावर आपली भूक शमवावी, अथवा देऊळ मोडून मग देवाला पौळीचा ओटा बांधूं लागावें, २२० त्याचप्रमाणें 'हिंसा करून अहिंसा साधावी,' असा कांहीं विलक्षण निर्णय पूर्वमीमांसंत केला आहे; २१ कारण, अवर्षणाचे संकट उद्भवलें, आणि तेणेंकरून सर्व जग गांजलें, म्हणजे पाऊस पडावा म्हणून नानाप्रकारचे यज्ञ करावे, २२ पण त्या यज्ञकर्माच्या बुडाशी उघड उघड पशुहिंसा आहे, मग तेथे अहिंसेची कड कशी लागणार ? २३ केवळ निर्भेळ हिंसेची पेरणी करून अहिंसेचे पीक हातीं कसें येणार? पण या याज्ञिकांचें साहस कांहीं विलक्षण आहे ! २४ आणि अर्जुना, ज्याला आयुर्वेद म्हणतात, तोही सर्व याच मार्गाने जातो, म्हणजे एक जीव वाचविण्याकरितां दुसऱ्या जीवाचा घात करावा, हेच त्याचे तत्त्व आहे. २५ नानाप्रकारच्या रोगांनी बुजबुजलेले व दुःखांत लोळणारे जीव पाहून, त्यांची हिंसा निवारण्याकरितां म्हणून रोग- चिकित्सा केली खरी, २६ पण त्या चिकित्सेने पहिल्याप्रथम एका वनस्पतीचे कंद खणविले आणि दुसऱ्या एका वनस्पतीला पानामूळासकट उपटलें, २७ कांहीं वनस्पती मध्येच आडव्या १ आडवी २ वृक्षांची.