पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी प्राणसंकटीं । परि सुकृत न प्रकटी । आंगें वोलें ॥ ४ ॥ खडी आला पान्हा | पळवी जेवीं अर्जुना । कां लपवी पण्यांगना | वडिलपण || ५ | आव्य आतुडे आडवीं । मग आढ्यता जेविं हारवी । ना तरी कुळवधू लपवी । अवेवां ॥ ६ ॥ नाना कृपीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥ ७ ॥ वरिवरी देहो न पूजी | लोकांतें न रंजी । स्वधर्मु वाध्वज । बांधों नेणे ॥ ८ ॥ परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें । न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥ ९ ॥ शरीरभोगाकडे | पहातां कृपणु आवडे । एन्हवीं धर्मविषयी थोडें । बहु न म्हणे ॥ २९० ॥ घरीं दिसे सांकड । देहींची ही आयती रोड । परि दानीं जया हो । सुरतरूसीं ॥ ११ ॥ किंबहुना स्वधर्मी थोरु | अवसरी उदारु | आत्मचर्चे चतुरु | एन्हवीं वेडा ॥ १२ ॥ केळींचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनियां गाढें । रसाळ जैसें ॥ १३ ॥ कां मेघांचें आंग झीले । दिसे वारेनि जैसें जाईल । परि वर्षती नवल | घनवट तें ॥ १४ ॥ तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धातीआयणी । एन्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ।। १५ ।। हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं मनुष्याचे मन, गुप्त पुरून ठेवलेला द्रव्याचा ठेवा कोठें आहे, तें सांगत नाहीं, त्याचप्रमाणं प्राणावर बेतलं तरीही जो आपण केलेले पुण्यकृत्य आपण होऊन तोंडाने लोकांत प्रकट करीत नाहीं; ३,४ अर्जुना, खट्याळ गाय जशी आलेला पान्हा चोरते; किंवा वेश्या आपलें उतार वय लपवते; ५ रानांत सांपडलेला श्रीमंत जशी आपली श्रीमंती मिरवीत नाहीं; कुलीन स्त्री जसे आपले अवयव नीट झांकून घेते; ६ किंवा शेतकरी जसा आपले पेरलेलें वीं नीट मातीखालीं बुजवतो; त्याचप्रमाणें जो आपलें दानादि पुण्यकृत्य नेहमीं गुप्त राखतो; ७ जो देहाचे दिखाऊ चोचले करीत नाहीं, लोकांची मर्जी प्रसन्न करण्याला झटत नाहीं, आणि आपल्या धार्मिक कृत्यांची शब्दांनीं उठावणी करीत नाहीं; ८ आपण केलेल्या परोपकाराचा जो उच्चार करीत नाहीं, शिकलेल्या विद्येला मिरवीत नाहीं, आणि संपादन केलेले ज्ञान लौकिक कीर्तिसाठी विकीत नाहीं; ९ शारीरिक विषयोपभोगाचे संबंधें जो कवडीचुंबकपणा करतो, परंतु धर्मकृत्यांत धन वेचतांना मागेंपुढे पहात नाहीं; २१० घरांत पहावं तर प्रत्येक गोष्टीची ददात, शरीर पहावें तर अगदीं रोडलेले, परंतु दान देण्याच्या चावत जो प्रत्यक्ष कल्पतरूबरोबरही प्रतिज्ञेनें स्पर्धा करतो; ११ सारांश, जो आपल्या धर्मकृत्यांत शहाणा, दानाच्या वेळीं सढळ हाताचा, आणि अध्यात्म चर्चेत चतुर, परंतु इतर विषयांत मात्र वेडसर; १२ केळीचा सोट हलका आणि फोंस असतो, परंतु त्यालाच रसभरित व भरदार फळे येतात; १३ किंवा ढगांचं अंग इतकें झिरझिरीत असतें कीं जसें काय वाऱ्याने उडून जाईल, पण नवलाची गोष्ट ही, कीं, त्यांतूनच कठिण गारा पडतात; १४ त्याचप्रमाणे ज्याला परम साधानाचा मार्ग पूर्णपणे माहीत असून, लौकिक गोष्टींत मात्र जो केवळ दीनवाणा असतो; १५ अर्जुना, हीं लक्षणें ज्याच्या ठिकाणीं विलसत असतील १ खंड्याळ, २ पैज ३ पातळ, झिरझिरीत. ४ समाधानाचा मार्ग,