पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४६१ जोडे । परि वेडिवेमाजीं दडे । महिमेभेणें ॥ ९१ ॥ चातुर्य लपवी | महत्त्व हारवी । पसेपण मिरवी । आवडोनी ॥ ९२ ॥ लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उगु । उगेपणीं चांगु । आथी भरु ॥ ९३ ॥ जगे अवज्ञाचि करावी | संबंधी सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥ ९४ ॥ तळोटेपण वाणे । अंगी हिणावो खेवणें । तें तेंचि करणें । बहुतकरुनी ॥ ९५ ॥ हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥ ९६ ॥ पैं चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होइजे ॥ ९७ ॥ माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो । मज झणें वासि॒पो । भूतजात् ॥ ९८ ॥ ऐसी जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जात जाये । नामेचि जो जिये । विजनाचेनि ॥ ९९ ॥ वायु आणि जेया पडे । गगनेसीं बोलों आवडे । जीवेंप्राणें झाडें । पढियंतीं जया ॥ २०० ॥ किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसी | शेजं जाहली ॥ १ ॥ पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं । आतां अभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥ २ ॥ तरि अभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें । जीवु जावोपरि नुमसे | ठेविला ठावो ॥ ३ ॥ तयापरी किरीटी | पडिलाहि बृहस्पतीसारखा जरी ज्ञानवंत असला, तरी जो मोठेपणाच्या भीतीनें वेडसरपणा पांघरून घेतो; ९१ ज्याला नांवलौकिकाचा कंटाळा आहे; शास्त्रार्थाची वटवट करणं सोडून निवांतपणे राहण्याकडे ज्याचा भर आहे; ९३ जगानें आपली हेळसांड करावी, सग्यासोयन्यांनीं आपल्याकडे ढुंकूनही पाहू नये, इत्यादि प्रकारची ज्याला मनापासून आवड असते; ९४ आंगीं लहानपणा बाणेल, हीनपणाचें भूषण अंगावर चढेल, असेंच वर्तन जो बहुतकरून ठेवतो; ९५ ' हा जीवंत नाहीं, हा मुळीं नाहींच; ' अशी लोकांची आपल्याविषयों भावना व्हावी, असें जो नेहमीं इच्छीत असतो; ९६ ' हा काय चालतो आहे, कीं वाऱ्याबरोबर लोटत जात आहे ?' असा लोकांना भ्रम पडावा, अशी ज्याची चालचलणूक असते; ९७ 'माझें अस्तित्व नाहींसें व्हावें, माझें नामरूप नष्ट व्हावें, मला पाहून या भूतमात्रांनीं भिऊन पळून जावें, ९८ असा जो नेहमीं नवस करतो; जो सर्वदा एकांताचा आश्रय करतो, निर्जन प्रदेशाच्या कल्पनेनेंच ज्याच्या जिवांत जीव येतो; ९९ ज्याचें वायूशी पटते; आकाशाबरोबर संवाद करणे ज्याला रुचतें; आणि झाडें हींच ज्याला जीवभावं आवडतात; २०० सारांश, अर्जुना, अशीं लक्षणें ज्या पुरुषाच्या ठिकाणीं तुला आढळतील, तो ज्ञानांत तल्लीन झाला आहे, असें समज. १ एखाद्या पुरुषाच्या ठायीं 'अमानित्व ' आहे कीं नाहीं हें या लक्षणांनी जाणावें. आतां 'अभित्व' कसे ओळखावें यात्रा मार्ग तुला दाखवतों. २ अभित्व हे पुढे सांगितलेल्या प्रकारचें असतें. अर्जुना, जीव गेला तरी जसें लोभी १ लहानपण, २ हीनपणा, दैन्य. ३ भूषण म्हणून धारण करणें. ४ भिवो, ५ शय्या. ६ उघड सांगत नाहीं,