पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६० सार्थ श्रीज्ञानेश्वरी आचारगौरव । सुकुलीनाचे ॥ ८१ ॥ अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्ती । कां दर्शनाचिये प्रशस्ती | पुण्यपुरुष ॥ ८२ ॥ ना तरी केळी कापूर जाहला । तो परिमळें जाणों आला । कां भिंगारी दीपु ठेविला | बाहेरि फांके ॥ ८३ ॥ तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जिये देहीं उमटती चिन्हें । तियें सांगों आतां अवधानें । चांगें आइक ॥ ८४ ॥ अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिराजवम् । आचार्योपासनं शौचं स्थेर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥ सम० - श्लाघेचा दंभहिंसेचा त्याग क्षांति अवक्रता । भक्ति श्रीगुरुची शौच स्थिरता चित्तनिग्रह ॥ ७ ॥ आर्या-मानत्याग अदभ क्षांति सरळता तशीचहि अहिंसा । स्थैर्य मनोजय शुचिता गुरुसेवा करिति ताप जे हिंसा ॥ ७ ॥ ओवी - अहंकार ना दंभादि धरी । हिंसा न करी आर्जव करी । गुरूचें भजन अंतरीं । पवित्रपणे अंतःकरण निरोधी ॥७॥ तरी कवणेही विपयींचें । साम्य होणें न रुचे । संभावितपणाचें । वोझें जया ॥ ८५ ॥ आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां । योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥ ८६ ॥ तैं गजवजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा । कां वाहीं तरतां वळसा | दाटला जेवीं ॥ ८७ ॥ पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे । गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥ ८८ ॥ पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ति कानीं नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥ ८९ ॥ तेथ सत्काराची के गोठी । के आदरा देईल भेटी । मरणेंसीं साटी | नमस्कारितां ॥ १९० ॥ वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी बाहेर उमगूं लागतें; १८० किंवा पृथ्वीच्या अंगीं जी मृदुता आहे ती लुसलुशीत कोंबानें प्रत्ययाला येते; अथवा कुलीन माणसाचें थोरपण त्याच्या आचरणावरून समजतें; ८१ किंवा आदरसत्कार करण्याच्या धांदलीवरून जशी स्नेहाची स्फुटता होते; किंवा शांत व भव्य चेहऱ्यावरून पुण्यशलि मनुष्याची ओळख पटते; ८२ किंवा कापुरकर्दळीमध्यें कापुरकालें झालें म्हणजे तें जसें दरवळणाऱ्या सुगंधावरून अनुमानितां येतें, अथवा भिंगाच्या कंदिलांत दिवा ठेवला म्हणजे त्याचा प्रकाश जसा बाहेर पसरतो; ८३ त्याचप्रमाणे हृदयांत ज्ञान उपस्थित झालें म्हणजे त्याचीं जीं चिन्हें बाहेर उमटतात, तीं आतां सांगतों. नीट ऐक. ८४ कोणत्याही लौकिक विषयांत एकजात रंगून जाणें ज्याला रुचत नाहीं, लोकांत संभावितपणा मिरविणं हे ज्याला संकटच वाटते; ८५ आपल्या अंगी असलेल्या गुणांचें स्तुतिस्तोत्र चाललें असतां, बहुमानाचा गाजावाजा झाला असतां, आणि मोठ्या योग्यतेची प्रौढी अंगाला चिकटली असतां, ८६ जो असा कांहीं कासावीस होतो, कीं हा जसा काय पारध्यानें फांसांत पाडलेला हरिणच आहे, किंवा पोहत असतांना जसा काय भोवऱ्यांतच सांपडला आहे; ८७ अर्जुना, अशा प्रकारें ज्याला लोकमान्यतेचं संकटच वाटते; जो लौकिक मोठेपणाला आपल्या अंगाला शिवी देत नाहीं; ८८ ज्याला स्वतांचा बहुमान डोळ्यानें पाहवत नाहीं, आपला लौकिक गायलेला ऐकवत नाहीं; लोकांनी आपली आठवण काढावी, हे ज्याला सहन होत नाहीं; ८९ मग आदरसत्काराची गोट कशाला पाहिजे ? लोकांनीं आपल्याला नमस्कार करणें हें ज्याला मरणासारखेच वाटते; १९०