पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४५९ जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी । जीवात्मया बुझावणी | मांडून दे ॥ ६८ ॥ जें इंद्रियांची दारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥ ६९ ॥ द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचे सुयाणें होये । जया ज्ञानाची सोये । ऐसें करी ॥ १७० ॥ मदाचा ठावोचि पुसी | जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाप उरों ॥ ७१ ॥ जें संसारातें उन्मूळी | संकल्पपंकु पाखाळी । अनावरा वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥ ७२ ॥ जयाचेनि जालेपणें । पांगुळ होइजे प्राणें । जयाचेनि विंदाणें । जग हें चेष्टे ॥ ७३ ॥ जयाचेनि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे | आनंदाचिया ॥ ७४ ॥ ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळले मन | चोख कीजे ॥ ७५ ॥ आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधि । ते जयाचिया सन्निधी । निरुजा कीजे ॥ ७६ ॥ तें अनिरूप्य की निरूपिजे | ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥ ७७ ॥ मग तेंचि इये शरीरीं । जें आपुला प्रभावो करी । तें इंद्रियांचिया व्यापारी | डोळांहि दिसे ॥ ७८ ॥ पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । जाणिजे तेविं करणें । सांगती ज्ञान ॥ ७९ ॥ अगा वृक्षास पाताळीं । जळ सांपडे मूळीं । तें शाखांचिये वाहाळीं । बाहेर दिसे ॥ १८० ॥ कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना जें ज्ञान झालें असतां, मोह नाहींसा करतें आणि जीवाशिवाची एकवाक्यता करून दाखवितें; ६८ जें ज्ञान इन्द्रियांचीं द्वारें बंद करतें, प्रवृत्तीच्या तंगड्या मोडतें, आणि मनाचें दुःख दूर करतें; ६९ ज्याच्यामुळें द्वैताचा दुकाळ पडतो, आणि समभावनेचा ऐक्याचा सुकाळ होतो; १७० जें ज्ञान महाचे ठिकाणच उडवतें, बलाढ्य मोहाला गिळून टाकतें, आणि ' हा मी आणि हा दुसरा ' अशी द्वैताची भाषाही उरू देत नाहीं, ७१ जें संसाराला समूळ उखळतें, संकल्पाचा चिखल साफ धुतें, आणि आकळण्यास अत्यंत कठिण अशा ज्ञेयवस्तूला म्हणजे परमात्मतत्त्वाला सहज कंटाळते; ७२ जें उदय पावलें म्हणजे जगाला चालविणारा प्राण पांगळा - निर्वट- होतो; ७३ ज्या ज्ञानाच्या प्रकाशानें बुद्धीचे डोळे उघडतात आणि जीव आनंदाच्या राशीवर लोळूं लागतो; ७४ असें जें अत्यंत पवित्र ज्ञान, ज्यानें दोपांत लडबडलेलें मन निर्मळ होते; ७५ ज्याच्या योगाने आत्म्याला लागलेला जीवभावाचा क्षयरोग साफ बरा होतो; ७६ तें ज्ञान निरूपिणे शक्य नसतांही आम्ही निरूपीत आहों. हे ऐकून बुद्धीनंच जाणावें, कारण बुद्धीवांचून तें नुसत्या डोळ्यांना दिसणारे नाहीं. ७७ पण तें एक बुद्धीने जाणल्यामुळे या शरीरावर आपली सत्ता चालवूं लागलें, म्हणजे ते इन्द्रियांच्या क्रियांच्या रूपाने डोळ्यांनाही दिसूं लागतें. ७० झाडांच्या तरारीने आणि तेजानें जसा वसंताचा प्रवेश कळतो, तद्वत् इंद्रियांवरून या ज्ञानाची अटकळ बांधतां येते. ७९ अरे, झाडांच्या मूळांना खोल पृथ्वीच्या पोटांत पाणी सांपडते, पण तें फांद्यांच्या पालवीच्या द्वारे