पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥ ५५ ॥ आणि वाहतेनि भौतिक । पाप पुण्य येथे पिके । म्हणोनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥। ५६ ।। आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परि असो हैं अनंतें । नामें यया ।। ५७ ॥ पैं परतत्त्वाअरौतें । स्थावरा आंतौतें । जें कांहीं होतें जातें । तें क्षेत्रचि हें ॥ ५८ ॥ परि सुरनरउरगी । घडत आहे योनिवि भागीं । तें गुणकर्मसंगीं । पडिलेंसातें ॥ ५९ ॥ हेचि गुणविवंचना । पुढ म्हणल अर्जुना । प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥ १६० ॥ क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार । म्हणोनि आतां उदार । ज्ञान आइकें ॥ ६१ ॥ जया ज्ञानालागीं । गगन गिळिताति योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥ ६२ ॥ न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड | योगाऐसें दुवाड। हेळसिती ॥ ६३ ॥ तपोदुर्गे वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवली ॥ ६४ ॥ नानाभजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं। एक रिघताति सुरंगीं । सुपुम्नेचिये ॥। ६५ ।। ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतन्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥ ६६ ॥ देईल गुरुसेवा | इया बुद्धी पांडवा | जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥ ६७ ॥ हीं छत्तीस तत्त्वें ज्याच्यामुळे एकरूप होतात, त्या एकरूपाला सामुदायिक दृष्टीनें ' क्षेत्र ' म्हणतात. ५५ आणि या महाभूतांच्या एकरूप गटाची राबणूक केली असतां यांत पापपुण्याचें पीक पिकतें, म्हणून आम्हीही याला अलंकारिक हटीनें 'क्षेत्र' हेच नांव देतों. ५६ आणि दुसरे कोणीएक याला 'देह' म्हणतात. पण हा विस्तार कशाला पाहिजे ? याला खरोखरच अनंत नांवें आहेत. ५७ परंतु परब्रह्माच्या अलीकडे आणि स्थावराच्या - जडाच्या मर्यादेपर्यंत जें जें कांहीं होतें आणि नाश पावतें तें तें सर्व क्षेत्रच. ५८ परंतु त्यांत देव, मानव, नाग असे योनिभेद- निरनिराळे वस्तुकोटीचे वर्ग पडतात, ते सत्त्व, रज व तम गुणांच्या व कर्माच्या संगतीनं उत्पन्न होतात. ५९ अर्जुना, ही गुणांची व्यवस्था तुला पुढें सांगण्यांत येईल. सांप्रत तुला ज्ञानाचें स्वरूप स्पष्ट करून सांगतों. १६० क्षेत्राचे विकारासह संपूर्ण स्वरूप तुला कथन केलें, आतां तुला निर्मळ ब भेजें ज्ञान, तें निवेदन करतो. ६१ ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी स्वर्गाची आडवाट ओलांडून लोक आकाशाला गिळंकृत करतात; ६२ ऋद्धिसिद्धींच्या मोहांत न पडतां, योगसाधनासारखी दुर्घट गोष्टही सहन करतात; ६३ तपाचे कठिण डोंगर ओलांडतात, कोट्यवधि यज्ञयाग नुसते आंवाळून टाकतात, आणि सबंध कर्मकांड उलटेपालटे करतात; ६४ किंवा भजनमार्गात मोठ्या आवेशाने उड्या घेतात; कोणी सुषुम्नेच्या भुयारांत प्रवेश करतात; ६५ अशा रीतीनें ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मोठमोठ्या मुनींच्या आशाळभूत इच्छा वेदरूपी झाडाच्या पानोपानीं घोंटाळत असतात; ६६ अर्जुना, केव्हांतरी कृपा होईल, या आशेनें ज्या ज्ञानाकरितां शेंकडों जन्म गुरुसेवेंत खर्चण्यांत येतात.६७ १ आडमार्ग. २ इच्छा.