पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४५७ करी । उपेगु जडा ॥ ४१ ॥ मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना । आतां धृतिविवंचना | भेदु आइक ॥ ४२|| तरि तत्त्वां परस्परें । उघड जातिस्वभाववैरें । नव्हे पृथ्वीतें नीरें | निनाशिने ॥ ४३ ॥ नीरातें आटी तेज । तेजा वायूसी जुंझ । आणि गगन तंव सहज । वायु भक्षी ॥ ४४ ॥ तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंत रिघोनि वेगळें । आकाश हें ॥ ४५ ॥ ऐसीं हीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें । कीं तिही ऐक्यातें । देहासि येती ॥ ४६ ॥ दंद्राची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एक एकातें पोखी । निजगुणें गा ॥ ४७ ॥ ऐसें न मिळे तयां साजणें । चाले धैर्ये जेणें । तया नांव म्हणे । धृति मी गा ॥ ४८ ॥ आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा | तो हा एथ जाणावा | संघातु पैंगा ॥ ४९ ॥ एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलेयातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥ रथांगांचा मेळावा | जेविं रथ म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥ ५१ ॥ करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिपती पुंजे | अक्षरांचे ॥ ५२ ॥ कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥ ५३ ॥ कां स्नेहसूत्रवन्ही । मे एक स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ ५४ ॥ तैसीं छत्तीसही आत्म्याच्या संगतीनें या शरीरांत राहून ही चेतना जडाला सजीव करते. ४१ हा चेतनाचा वृत्तांत झाला. अर्जुना, आतां धृतीचें वर्णन ऐक. ४२ अरे, या पांच महाभूतनामक तत्त्वांचे स्वभावतःच वैर आहे. पाण्यानें पृथ्वीचा नाश होत नाहीं असें कधींच घडत नाहीं. पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाची वायूवरोबर झटापट होते, आणि गगन तर वायूला सहज गिळून गट्ट करतें. ४४ त्याप्रमाणेच आकाश हे कोणाशींही मिसळत नाहीं, तरीपण प्रत्येकांत घुसून ते आपले स्वतंत्रच राहतें. ४५ या प्रकारें या पांच भूतांचे एकमेकांशी पटत नाहीं; तरीपण तींही या देहक्षेत्रांत एकत्र मिळतात. ४६ आपल्या स्वाभाविक वैराची कटकट सोडून, तीं येथे एके ठिकाणीं राहतात आणि आपापल्या गुणांनी परस्परांचे पोपण करतात. ४७ अशी सहसा न घडणारी त्यांची जूट ज्याच्या योगानं घड़न येते व टिकते, त्या धैर्याला 'धृति' हें नांव आहे. ४८ आणि अर्जुना, जीवासह या छत्तीसही तत्त्वांचा जो गट, त्यालाच या प्रकरणांत 'संघात' म्हणतात. ४९ अशा प्रकारें मी तुला छत्तीस तत्त्वांचीं लक्षणें स्पष्ट कथन केलीं आहेत, या सगळ्यांना 'क्षेत्र' म्हणावे. १५० रथाच्या निरनिराळ्या भागांच्या सजावटीला जसे ' रथ' हे नांव देतात, किंवा वरील व खालील अशा सर्व अवयवांच्या संचाला जसे 'देह' म्हणतात; ५१ अथवा हत्ती, घोडे, यांच्या संघटनेला जसे 'सैन्य' हें नांव मिळते; किंवा अक्षरांच्या समूहाला जसे 'वाक्य' म्हणण्यांत येते; ५२ अथवा मेघांच्या पिंडांना 'आभाळ' आणि सर्व लोकसमुदायाला ' जग' असे म्हणतातः ५३ अथवा तेल, वात, आणि अग्नि, यांचा एकत्र जमाव झाला म्हणजे 'दिवा' होतो; ५४ त्याप्रमाणंच ५८