पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी मोडित जें ये ॥ २८ ॥ जयाचेनि जालेपणें । पांगुळा होइजे प्राणें । सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥ २९ ॥ कां आघवियाचि इंद्रियवृत्ति । हृदयाचिया एकांतीं । थापटूनि सुषुप्ति । आणी जें गा ॥ ३० ॥ किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥ ३१ ॥ आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था । जीणे तेंचि सर्वथा । दुःख जाणें ॥ ३२ ॥ तें मनोरथसंगें नव्हे । एन्हवीं सिद्धी गेलेंचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥ ३३ ॥ आतां असंगा साक्षीभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पांडुसुता । चेतना येथ ॥ ३४ ॥ जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरीं । पालटेना ॥ ३५ ॥ मनबुद्धयादि आघवीं । जियेचेनि टवटवी । प्रकृतिवनमाधवी | सदांचि जे ॥ ३६ ॥ जडाजडी अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसीं । लटिकें नाहीं ॥ ३७ ॥ पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥ ३८ ॥ नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ ३९ ॥ अगा मुखमेळेंविण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥ १४० ॥ पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं । सजीवत्वाचा वाचेला, आणि देहाला जें शपथेनें बांधून टाकितें; जें देहाच्या आठवणीला निराधार करून सोडतें; २८ जे जन्माला आल्याबरोबर प्राणाला पांगळेपणा येतो; पण सात्त्विकाला मात्र जें दुहेरी लाभ करून देतें; २९ शिवाय जें सर्व इन्द्रियांच्या वृत्तींना हृदयामध्यें आंजारून गोंजारून शांतपणे झोपवतें; १३० इतकेंच नव्हे, तर जीवास आत्मस्वरूपाचा मार्ग ज्या अवस्थेत सांपडतो, त्या अवस्थेत जें भासमान होते; त्यालाच 'सुख' हें नांव आहे. ३१ आणि, अर्जुना, अशी जोड ज्या अवस्थेत होत नाहीं, त्या अवस्थेतले जिणें म्हणजेच सर्वस्वी दुःख, असें तूं समज. ३२ संकल्पविकल्पांच्या संगतीं सुख केव्हांही नसते; पण संकल्पविकल्प नाहींसे झाले, कीं, तें सुख स्वयंसिद्धच आहे. तेव्हां, संकल्पविकल्प असणं आणि नसणें या दोन कारणांमुळेंच दुःख आणि सुख हीं अनुक में संभवतात. ३३ अर्जुना, या देहांत जी संगहीन व उदासीन चैतन्याची शक्ति राहते, तिला 'चेतना' हें नांव आहे. ३४ जी नखापासून केसांपर्यंत संबंध शरीरांत सारखी जागती असते; जी जागृति इत्यादि तीन्ही अवस्थांत अखंड राहते; ३५ मन, बुद्धि इत्यादिकांना जी टवटवी आणते; प्रकृतिरूपी वनाला जी वसंतलक्ष्मीच होते; ३६ जी सजीव आणि निर्जीव पदार्थातही अंशभेदाने म्हणजे कमीअधिक प्रमाणानें नेहमीच संचार करते; तीच चेतना होय. अर्जुना, यांत तिळमात्रही असत्य नाहीं. ३७ अर्जुना, राजाला कांहीं आपल्या सैनिकांचें व्यक्तिशः ज्ञान नसते, परंतु त्याची आज्ञा परचक्राचा पराभव करते, किंवा चंद्र कलांनी पूर्ण झाला म्हणजे समुद्राला परस्पर उधान येतें; ३८ अथवा चुंचकर्माणि जवळ असला म्हणजे लोखंड आपोआप हालवलें जातें; किंवा सूर्य प्रकट झाला म्हणजे लोक आपसूक जागे होतात, ३९ किंवा पिल्यांच्या तोंडाला तोंड न लावतां, ज्याप्रमाणं कांसवीच्या केवळ दृष्टीनंच त्यांचें पोषण होतं; १४० अर्जुना, त्याचप्रमाणे