पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

I अध्याय तेरावा ४५५ उतरडी | उतरी रची ॥ १४ ॥ जें भुलीचें कुहर | वायुतत्त्वाचें अंतर | बुद्धीचें द्वार | झांकविलें जेणें ॥ १५ ॥ तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विपयाभिधान । भेदु आइकें || १६ || तरी स्पर्श आणि शब्द । रूप रस गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥ १७ ॥ इहीं पांच द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी । जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ॥ १८ ॥ मग स्वर वर्ण विसर्ग | अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥ १९ ॥ हे कर्मेंद्रियांचे पांच । विपय गा साच । जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥ १२० ॥ ऐसे हे दाही । विपय गा इये देहीं । आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥ २१ ॥ तरि भूतलें आठवे । कां बोलें कानु झांकवे । ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ति ॥ २२ ॥ इंद्रियां विपयांचिये भेटी । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥ २३ ॥ जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धांवणें । न रिघावें तेथ करणें । तोंडें सुती ॥ २४ ॥ जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धि होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ।। २५ ।। आणि इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । जेथ जोडेऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥ २६ ॥ आतां यावरी सुख । तें एवंविथ देख । जेणें एकेंचि अशेख | विसरे जीव ॥ २७ ॥ मना वाचे काये । जें आपुली आप वाये । देहस्मृतीची त्राये | I अशी रचलेली सृष्टि पुन्हां मोडूनही टाकतें; जें मनोराज्याचे मनोरे उभारतें आणि पाडतें; १४ जें भ्रमिपणाचे कोठार व वाऱ्याचा गाभा आहे; जे बुद्धीचं दार लावून टाकतें; १५ अर्जुना, त्याला मन समजावें. यांत संशयाला मुळींच जागा नाहीं. आतां विषयांचे प्रकार श्रवण कर. १६ स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध, हे पांच प्रकारचे विषय ज्ञानेन्द्रियांचे आहेत. १७ जसें हिरवी चार पाहिली म्हणजे उत्कंठेनें कावरेबावरें होऊन जनावर तिकडे धांव मारतें, त्याप्रमाणें या पांच दारांनीं ज्ञान बाहेर धांव ठोकीत असतें. १८ आतां, स्वर, व्यंजन आणि विसर्ग, यांचा उच्चार करणें, कांहीं पकडणें, सोडणें, चालणें आणि मलोत्सर्जन करणें, हे कर्मेन्द्रियांचे पांच विषय; यांची माचण बांधून तिच्या आधारे कियेची प्रवृत्ति होते. १९, २० अशा प्रकारें या शरीरांत दहा विषय आहेत. आतां इच्छेचें वर्णन करतों. २१ एकादी मागे घडलेली गोष्ट आठवतांच किंवा तिच्यासंबंधीं शब्द कानावर पडतांच, जी भावना क्षुब्ध होते; २२ इन्द्रिय आणि विषय यांची गांठ पडताक्षणींच जी कामाचा हात धरून उभी राहते; २३ जी उठल्याबरोबर मन सैरावैरा धावू लागतें, आणि जेथें पायही घालूं नये तेथें इन्द्रियें तोंडें घालूं लागतात; २४ ज्या भावनेच्या आवडीनें बुद्धि वेडीखुळी होऊन नादावते आणि जिला विषयांची अतिशय चट असते; अजुना, अशी जी भावना, ती इच्छा होय. २५ आणि इच्छिल्याप्रमाणें जेव्हां इंद्रियांना विषयोपभोग लाभत नाहीं, तेव्हां तो विषय मिळालाच पाहिजे अशा तन्हेच्या आढीचा जो विकार उत्पन्न होतो, तोच द्वेष म्हणावा. २६ आतां सुख म्हणजे काय तें ऐक. ज्याच्यामुळे जीवाला इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो, २७ मनाला,