पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जाणिजती । आइके कैवल्यपति । सांगतसे ॥ १ ॥ प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि 'रिगिनिगी द्वारीं । पांचें इहीं ॥ २ ॥ एवं दहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥ ३ ॥ जें इंद्रियां आणि बुद्धी । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदी | तरळत असे || ४ || नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णा लहरीं । तैसें वायांचि फरारी । वाव जाहलें ॥ ५ ॥ आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ ६ ॥ मग तिहीं दाहेभागीं । देहधर्माच्या खैवंगीं । अधिटिलें आंगीं । आपुलाल्या ॥ ७ ॥ तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ | म्हणोनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥ ८ ॥ तें बुद्धीसी वाहिरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥ ९ ।। वायां मन हें नांव । एन्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥ ११० ॥ जें प्रवृत्तीसि मूळ | कामा जयाचें वळ । जें अखंड सूये छ । अहंकारासी ॥ ११ ॥ जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥१२॥ द्वैत जेथें उठी। अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमाजीं ॥ १३ ॥ संकल्पें सृष्टि घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या यांना 'कर्मेंद्रियें' असें नांव आहे. १ अर्जुना, प्राणाची प्रियसखी जी शरीरांत राहणारी 'क्रिया- शक्ति' ती याच पांच दारांनीं जा-ये करीत असते. २ याप्रमाणें पांच ज्ञानेंद्रियें व पांच कर्मेंद्रियें तुला सांगितलों. अर्जुना, आतां मन म्हणजे काय, तें स्पष्ट करून देतों, ऐक. ३ इंद्रियें आणि बुद्धि यांच्या मधल्या सांध्यावर, रजोगुणाच्या खांद्यावर चढून जे खेळ करीत असतें, ४ आकाशां- तला निळा रंग, कीं सूर्यकिरणांतले मृगजळ यांच्याप्रमाणें जें नुसती भासमान होणारी वायूची चमक आहे, तें मन होय. ५ आणि पुरुषाचें शुक्र व स्त्रीचें शोणित हीं एके ठिकाणी मिळतांच जी पंच महाभूतांची रचना आकारली जाते, त्यांत वायुतत्त्वाचे दहा प्रकार होतात. ६ मग ते दशविध वायु शरीराच्या दहा भागीं आपापल्या विशिष्ट धर्मानीं युक्त होऊन निरनिराळे राहतात. ७ पण त्यांच्या अंगों एकजात निर्भेळ चंचळपणा वसत असतो, त्यामुळें त्याला रजोगुणाचें बळ चढते. ८ हैं चंचलत्व बुद्धीच्या बाहेर पण अहंकाराच्या उरावर असें मधल्या प्रदेशांत प्रबळ होते. ९ याला 'मन' हे कांहींतरी नांव दिले आहे; खरोखर म्हटलें तर तें केवळ कल्पनेची मूर्ति आहे. ज्याच्या संगतीमुळे ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते; ११० जें मायेचें मूळ आहे, ज्यानें कामवासनेला जोर चढतो, जें अहंकाराला नेहमीं डवचीत असतें ११ जें इच्छा पुरवतें पण आशेला वाढवतें, आणि जं भयाला पुष्टि देते; १२ जें द्वैताचा उठाव करतें, अविद्येला माज आणतें; आणि इंद्रियांना विषयोपभोगांत लोटून देतें; १३ जे केवळ कल्पनेनें सृष्टि रचितें, १ आंत येणें व बाहेर जाणें, येरझारा, ये-जा. २ घालतें करते. ३ छळणूक, टोचणी,