पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥ ९९० ॥ म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळा शिवेतला । सोमकांतु ॥ ९१ ॥ तयापरी पार्छु । अतिस्नेहें मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेंमीं ॥९२॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अ. उ. -ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥१८॥ सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ २९ ॥ गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते । न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥ ३० ॥ सम० - कृपैकरुनि आविष्ट विषादे बोलिला असें । देखोनि कृष्ण स्वजन युद्धार्थी सिद्ध जे उभे ॥ २८ ॥ पिळती सर्वही गात्रें दुःखें मुखहि वाळतें । शरीरीं कांप सुटतो अंगी रोमांच ऊठती ॥ २९ ॥ हातापासोनि गांडीव गळतें जळते त्वचा । उभा राहोहि न शके वाटे भोंवतसे मन ॥ ३० ॥ आर्या - मानुनि विषाद चित्तीं बोले होवोनियां कृपाव्याप्त । कृष्णा पाहुनि त्यांतें जे युद्धोयुक्त सर्वही आप्त ॥२८॥ गात्रै खिन्न समस्तें मुख शुष्कहि आणि सर्व तनु कंपा। पावे रोमांचित तनु उपजलि चित्तांत तीव्र अनुकंपा ॥ हस्तापासुनि गळतें गांडिव आला तनूशि हिंवजाळ । बैसाया शक्ति नसे भ्रमवी चित्तास मोहजंजाळ ॥३०॥ ओव्या-पाहे परम कृपेंकरून । विषाद पावलें से मन । युद्ध करूं इच्छिती स्वजन । पाहं पां कृष्णदेवा ! ॥ २८ ॥ दुःख होतसे गात्रांसी । मुख शोषतें हृषीकेशी !। कंप रोमांच अंगासी । अशी स्थिती जाहली ॥ २९ ॥ धनुष्य पडे हातींहून | त्वचा जळे संतापाने । भ्रमतसे माझें मन । उभे राहू शकेना ॥ ३० ॥ तो म्हणे अवधारीं देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्रवर्ग आघवा । देखिला एथ ॥ ९३ ॥ हे संग्रामीं उदित | जहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥ ९४ ॥ येणें नांवेंचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मनोबुद्धी ठायीं । स्थिर नोहे ॥ ९५ ॥ देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥ ९६ ॥ सर्वांगा कांटाळा आला । अतिसंतापु उपनला । तेथ वेवळ हातु गेला । गांडीवाचा ॥ ९७ ॥ तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें | मोहें येणें ॥ ९८ ॥ जें वज्रापासोनि कठिण | दुर्धर बसला. १९० या कारणानें अर्जुनाचा स्वाभाविक धीर गळाला, आणि त्याच्या अन्तःकरणाला द्रव आला. चंद्रकलेनें स्पर्श केल्यामुळे ज्याला पाझर सुटले आहेत, अशा चंद्रकान्त मण्याप्रमाणें अत्यन्त दयेनें विरघळलेला अर्जुन खेदयुक्त वाणीनें भगवन्तांस म्हणाला:-- ९१, ९२. " देवा, ऐकावें. मी हा सर्व जमाव पाहिला, तों यांत सगळा आमचाच गोतवळा दिसतो. ९३ हे सर्व युद्धाला सिद्ध झाले आहेत, हें खरें पण आपणही तसें करणें कसें योग्य होईल ? ९४ या गोष्टीचें नांव घेतांच मी अगदीं भांबावून जात आहे. माझें भान अगदीच सुटतें. मन आणि बुद्धि हीं भ्रमूं लागतात. ९५ पहा, माझें शरीर थरथरत आहे, तोंडाला कोरड पडत आहे, आणि सर्व गात्रें अगदी गळून जात आहेत. ९६ सर्व अंगावर कांटा उभा राहिला आहे, अन्तःकरणाला अत्यन्त व्यथा होत आहे, आणि त्यामुळे गांडीव धनुष्य धरणारा हा हातही सैल पडत आहे. ९७ हें गांडीव ढिलें होऊन निसटले; पण तें हातांतून गळलें, हेंही मला समजलें नाहीं, इतकें माझें हृदय या मोहानें ग्रस्त झाले आहे !" ९८ ते गांडीव वज्रापेक्षांही अधिक कठीण, असह्य, व भयंकर होतें, १ स्पर्शला, २ आपल्याला. ३ कांटा, रोमांच, ४ उपजला, ५ बळद्दीन, शिथिल,