पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४५३ जिये अधमोत्तम मुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विपो जीवें ॥ ८७ ॥ जे तेजतत्त्वाची आदि । जे सत्त्वगुणाची वृद्धि । जे आत्मया जीवाची संधि । वसवीत असे जे ॥ ८८ ॥ अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण | आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥ ८९ ॥ पैं सांख्याचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामति । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥ ९० ॥ आणि सांख्ययोगमतें । प्रकृति परिसविली तूतें । ऐसी दोहीं परी जेथें । विवंचिली ॥ ९१ ॥ तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथें अव्यक्त ऐसा | पर्यावो हा ॥ ९२ ॥ तम्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं । कां हारपे अस्तमानीं । भूतक्रिया ॥ ९३ ॥ ना तरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या ॥ ९४ ॥ कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । कां वस्त्रपणें तंतु । दशे राहे ॥ ९५ ॥ तैसे सांडूनियां स्थूळधर्म | महाभूतें भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होउनि जेथें ॥ ९६ ॥ अर्जुना तया नांवें । अव्यक्त हैं जाणावें । आतां आइकें आघवे । इंद्रियभेद ॥ ९७ ॥ तरि श्रवण नयन | त्वचा घाण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥ ९८ ॥ इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखाची खिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥ ९९ ।। मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार | पांच आणिक ॥ १०० ॥ कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें चांगलें, हें वाईट अशी जी निवड करते; ८६ जिच्या साह्यानें बरें वाईट, लहान थोर, इत्यादि कळते आणि जिच्या दृष्टीच्या द्वारें जीवाला विषयांची पारख करतां येते ८७ जी ज्ञानतेजाचें मूकारण आणि सत्त्वगुणाची चढतीवाढती अवस्था आहे, जी जीव आणि शिव यांचा संबंध जुळविते. ८८ अर्जुना, अशी जी, ती बुद्धि जाणावी. आतां अव्यक्त प्रकृतीचीं लक्षणें ऐक. ९० सांख्यशास्त्राच्या व योगशास्त्राच्या मतांप्रमाणे होणारे प्रकृतीचे दोन प्रकार तुला मागेंच ( सातव्या अध्यायांत ) सांगितले आहेत. ९९ त्यांत दुसरी ' पराप्रकृति' जी जीवदशा ( ज्ञानदेवी, ७१९ ) तिलाच येथे 'अव्यक्त' हे दुसरे नांव आहे. ९२ अरे, रात्र उजळली म्हणजे जशीं नक्षत्रं आकाशांतच जिरून जातात, किंवा दिवसाचा अस्त झाला म्हणजे जशा प्राणिमात्राच्या चळवळी बंद होतात, ९३ किंवा, अर्जुना, देह नाहींसा झाला म्हणजे देह इत्यादि सर्व विकार कृतकर्मात गुप्त राहतात; ९४ किंवा वियेच्या स्वरूपांत जसा सर्व वृक्ष गूढ स्थितीने समावतो, किवा जसा तंतु वस्त्ररूपानें राहतो; ९५ त्याप्रमाणेच सर्व स्थूळ धर्म टाकून देऊन, महाभूतें व भूतसृष्टि पावून ज्यामध्ये सूक्ष्म रूपाने राहतात, ९६ अर्जुना, त्याला अव्यक्त' हें नांव आहे. आतां इंद्रियांचे भेद श्रवण कर. ९७ कान, डोळे, कातडी, नाक आणि जीभ, हीं पांच ज्ञानेन्द्रियें समजावीं. ९८ या पत्रांची जूट झाली म्हणजे यांच्या द्वारें बुद्धि सुखदुःखाची विचारणा करते. ९९ याशिवाय आणखी वाणी, हात, पाय, गुदद्वार, व शिन, असे पांच प्रकार आहेत. १०० १ पर्याय, दुसरें नांव. २ चर्चा,