पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सांगितली तुजप्रती । आघवीचि ॥ ७४ ॥ आतां महाभूतें कवणें । कवण विपयो कैसी करणें । हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥ ७५ ॥ तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥ ७६ ॥ आणि जागतिये दशे | स्वप्न लपालें असे । ना तरी अंवसे । चंद्र गूदु ॥ ७७ ॥ नाना अप्रौढ वाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥ ७८ ॥ किंबहुना काष्ठीं । वन्हि जेविं किरीटी | तेविं प्रकृतीचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥ ७९ ॥ जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिप पहातु । मग जालिया आंतु । वाहेरी व्यापी ॥ ८० ॥ तैसी पांचांही गांठी पडे । जैं देहाकारू उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥। ८१ ।। नवल अहंकाराची गोठी । विशेपें न लगे अज्ञानापाठीं । सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥ आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशिया चिन्हीं जाणिजे | बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥ ८३ ॥ तरी कंदर्पाचेनि वळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें । विभांडूनि येती पाळे | विपयांचे ॥ ८४ ॥ तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ रैगाणों लागे जीवा । तेथ दोहींसी बरवा | पाडु जे धरी ॥ ८५ ॥ हें सुख हैं दुःख । हें पुण्य हे दोख । कां हैं मैळ हें चोख । ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥ या सर्वाचं व्यक्त स्वरूप म्हणजे क्षेत्र. क्षेत्रतत्त्वांची ही तुला नामावळी सांगितली आहे. ७४ आतां, महाभूतें कोणती, विषय कोणते, इंद्रियें कशा स्वरूपाची असतात, हें सर्व तुला एक एक तत्त्व घेऊन पृथक सांगतों. पृथ्वी, आप, तेज, वायु, आणि आकाश, हीं पांच महाभूतें समज. ७६ आणि जागृतीच्या अवस्थेत जशी स्वभावस्था दडून राहिलेली असते, किंवा अवसेला जसा चंद्र अदृश्य राहतो; ७७ अथवा प्रौढावस्थेजवळ आलेल्या मुलामध्यें जसें तारुण्य थवकून राहिलेलें असतें; किंवा मुक्या कळींत जसा सुगंध गुरफटून गेलेला असतो, ७८ किंवा लांकडांत जसा अग्नि गुप्तपणें वसत असतो; त्याप्रमाणंच जो प्रकृतिमायेच्या पोटांत लपलेला असतो; ७९ आणि मग, रुधिरादि शरीरांतील धातूंमध्ये मुरलेला ताप जसा कुपथ्य झाल्याचें निमित्त टपून पहात राहतो, आणि तेवढें निमित्त सांपडलें कीं तत्काळ रोग्याला अंतर्बाह्य व्यापून टाकतो, ८० त्याप्रमाणेंच जेव्हां या पांच महाभूतांची एकत्र गांठ होते आणि हा देहाकार बनतो, तेव्हां त्या देहाला जिकडेतिकडे नाचवावयाला जो लावतो; अर्जुना, तो अहंकार जाणावा. ८१ या अहंकाराची कथा कांहीं चमत्कारिकच आहे. हा अज्ञानी लोकांच्या फारसा पाठीशीं लागत नाहीं. पण हा ज्ञानी लोकांना गळामिठीत पकडता आणि नाना प्रकारच्या कष्टांत त्यांना नाचत ठेवतो ! ८२ आतां जिला बुद्धि म्हणतात, तिला पुढील लक्षणांवरून ओळखावें. अर्जुना, तीं लक्षणें सांगतों, ऐक. ८३ कामवासना बळावली म्हणजे इंद्रियवृत्तींचा भेद करून विषयांचे समुदाय आंत घुसतात. ८४ असे झाले म्हणजे जीवाला सुखदुखाच्या लुटीचा जो उलगडा करून द्यावा लागतो त्या व्यवहारांत जी सुख:दुखाचे मोजमाप अगदीं कांटेकोरीनं करते, ८५ हें सुख, हें दुःख; हें पुण्य, हें पाप; हें १ कामविकाराच्या २ नागवण, लूट. ३ हिशोब द्यावा.