पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४५१ होऊनि भ्रमितें | जीवमृगें ॥ ६३ ॥ न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा | करूनियां माजिवडा | आकारगजु ॥ ६४ ॥ म्हणोनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता । ऐसे बाद पांडुसुता । क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥ हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं । पुराणें इयेविपीं । मतपत्रिका ॥ ६६ ॥ आनुष्टुभदि छंदें । प्रबंधीं जियें विविधें । तें पत्रावलंबन मदें । करिती - अझुनी ॥ ६७ ॥ वेदींचं बृहत्सामसूत्र । जें देखणेपणें पवित्र । परी तयाही हें क्षेत्र | नेणवेचि ॥ ६८ ॥ आणीक आणिकींही बहुतीं । महाकवीं हेतुमतीं । ययालागी मति । वेंचिलिया ।। ६९ ।। परि ऐसें हैं एवढे । की अमुकेयाचेचि फुडें । हें असे कोण्हाही वैरपडें । होयचि ना ॥ ७० ॥ आतां यावरी जैसें । क्षेत्र हैं असे । तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥ ७१ ॥ महाभूतान्यहंकारो बुद्धिव्यक्तमेव च । इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥ इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः । एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६॥ सम० - महाभूतें अहंकार बुद्धि अव्यक्त आठवें । दशेंद्रियें एक मन शब्दस्पर्शादि पंचक ५ ॥ संघात या चोविसांचा क्षेत्र इच्छा सुखासुख । द्वेषप्रतीति वृत्तीची धारणा तद्विकार हे ॥ ६ ॥ आर्या- पंचमहाभूतें हीं बुद्धी अव्यक्त अणि अहंकार । एकादशेंद्रिये ते पंच विषय करिति जे बहु विकार ॥ ५ ॥ संघात चतना धृति वैरेच्छा दुःख सौख्यहि विकारी । क्षेत्र तुला संक्षेपें कथिलें हें तूं अहेसि अधिकारी ॥ ६ ॥ ओव्या - महाभूतें आणि अहंकार । बुद्धि अव्यक्त असे थोर । दशैंद्रियांचा विस्तार पांच इंद्रियविषय जाण ॥ ५ ॥ इच्छा, द्वेष, सुख, दुःख । देह, चेतना, धृति देख । इतुकियांतें क्षेत्र म्हणती आईक । बुद्धिवंत पैं ॥ ६ ॥ तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥ ७२ ॥ मन आणीकही एक । विपयांचा दशकु | सुख दुःख देख | संघात इच्छा ॥ ७३ ॥ आणि चेतना धृति । एवं क्षेत्रव्यक्ति । घळींत निर्जीव होऊन कोसळतात ! ६३ पहा, पहा, या काळसिंहाचा जबडा केवढा पसरला आहे हा ! या जबड्यांत हा विश्वाकाराचा हत्ती गडप होऊन जात आहे ! ६४ म्हणून, एका काळाचीच सत्ता या क्षेत्रावर आहे, असा आम्ही काळवादी सिद्धांत करतो. " अर्जुना, या देहक्षेत्रासंबंध असे नाना प्रकारचे पक्ष झाले आहेत. ६५ नैमिषारण्यांत या विषयाची भवति न भवति ऋषींनीं पुष्कळ केली, आणि पुराणग्रंथ या ऊहापोहाचें प्रत्यक्ष प्रत्यंतर आहेत. ६६ अनुष्टुभादि छंदांत याविषयीं जी विविध चर्चा केलेली आहे त्या ग्रंथांचा आधार अद्यापही मोठ्या आवेशानं घेतला जातो. ६७ वेदांत बृहत्सामसूत्र हे ज्ञानदृष्टीने फार पवित्र आहे, पण त्यालाही या क्षेत्राचा छडा लागलेला नाहीं. ६८ याशिवाय आणखी पुष्कळ दूरदृष्टि महाकवींनीं या क्षेत्राचा विचार करण्यांत आपली बुद्धिसंपत्ति खर्ची घातली आहे. ६९ परंतु, हैं क्षेत्र अशा प्रकारचे किंवा इतक्या विस्ताराचं आहे, आणखी तें खरोखर अमक्या एकाचें आहे असें कांहीं कोणालाही समजलें नाहीं. ७० आतां, यानंतर या क्षेत्राचे साद्यंत स्वरूप तुला निवेदन करतो. ७१ अरे, महाभूतांची पंचकडी, अहंकारबुद्धि, अव्यक्त प्रकृति, इंद्रियांची वसकडी, ७२ यांशिवाय आणखी एक मन, विषयांची दसकडी, आणि सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, ७३ चेतना, व धृति, १ ऊहापोह, खल. २ ज्ञानानें, ३ सांपडलेलें,