पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५० सार्थ श्रीज्ञानेश्वरी कैसे तुम्ही ॥ ५१ ॥ परतत्त्वाचिया गांवीं । संकल्पसेज देखावी । तरि कां पां न मनावी । प्रकृति तयाची ॥ ५२ ॥ परि असो हें नव्हे । तुम्ही या न लगावें । आतांचि हें आघवें । सांगिजेल || ५३ ।। तरि आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें | अंतरिक्ष तारागणें । धरी कवण ॥ ५४ ॥ गगनाचा तडावा । कोणें वेढिला केधवां । पवनु हिंडतु असावा । हें कवणाचें मत ॥ ५५ ॥ रोमां कवण पेरी । सिंधु कवण भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥ ५६ ॥ तैसें क्षेत्र हैं स्वभावें । हे वृत्ति कवणाची नव्हे । हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥ ५७ ॥ तंव आणि एकें । क्षो म्हणितलें निकें । तरि भोगिजे एकें । काळें केविं हें ॥ ५८ ॥ तरि ययाचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमतीं भरु । अभिमानियां ॥ ५९ ॥ हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परि काय कीजे वांजेटा । पूरीजत असे ॥ ६० ॥ महाकल्पापरौती । कव घालून अवचितीं । सत्यलोक भद्रजाती । आंगीं वाजे ॥ ६१ ॥ लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । स्वर्गीचिये आडवे । रिगोनि मोडी ॥ ६२ ॥ येरें ययाचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्ते । निर्जीवें एक मतवाले पुढे सरसावून म्हणाले, “महाराज, आपण एकंदरींत चांगलेच चिकित्सक दिसतां ! ५१ अहो, परब्रह्माच्या गांवांत जर संकल्पाचें शेजघर कल्पावयाचें आहे, तर मग सांख्यमतांतली त्या परब्रह्माची प्रकृतीच खरी मानली तर कोठें बिघडतें ? ५२ पण जाऊं द्या हें कांहीं खरं नाहीं, एवढे खास. जन हो, तुम्ही याच्या नादी लागूं नये. या प्रश्नाची खरी व्युत्पत्ति आतां आम्ही सर्व सांगतों, ती ऐका. ५३ आकाशांत ढगांचे ढीग कोणी भरले ? आकाशांत आणि तारांच्या समूहांना कोण सांवरून धरतो ? ५४ आकाशाचें छत कोणीं आणि केव्हां ताणलें ? वाऱ्याने नेहमी वाहतच राहिले पाहिजे, अशी कोणीं आज्ञा केली आहे ? ५५ केसांची पेरणी कोणी केली ? समुद्राला भरवण कोणी घातलें ? पावसाच्या धारा कोण वळतो ? हें जसें आपल्या स्वभावधर्मानेंच कोणा एकाचें विशिष्ट वतन नाहीं. ५६ घडून येते, तसेंच देहक्षेत्र हें स्वाभावसिद्ध आहे. हें कांहीं याची जो मशागत करील, त्याचें तें होतें, इतरांना तें लाभत नाहीं. " ५७ स्वभाववादी असें प्रतिपादीत आहेत, तोच दुसरे एक तावातावाने म्हणाले, कीं, " असें जर म्हणावें, तर मग या देहक्षेत्रावर एकट्या काळाची निरंतर सत्ता कां म्हणून आहे ? ५८ या काळाची सत्ता अनिवार्य आहे, हें पक्के माहीत असूनही तुम्ही आपल्या मताचा खोटा अभिमान वाहात आही ५९ हैं जणूं काय रागावलेला मृत्यूच किंवा सिंहाची गुहा आहे; पण काय करावें ! तुमच्यासारख्या भकभक्यांना ते कोठचे पटणार ? ६० हा काळसिंह महाकल्पाच्या पलीकडेही आपल्या वेंधेची पकड घालून ब्रह्मलोकरूपी हत्तीवरही झांप घालतो. ६१ नवे नवे लोकपाळ आणि दिग्गजांचे कळप यांचा हा काळसिंह स्वर्गाच्या रानांत घुसून, संहार करतो. ६२ आणि दुसरीं जीं दुर्बळ जीवरूपी हरणें बगैरे असतात, तीं या काळसिंहाच्या नुसत्या अंगाच्या वाऱ्यानेंच जन्ममृत्यूच्या १ बज्याला २ हती.