पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४४९ भली ॥ ३९ ॥ तंव एक मतिवंतीं । या वोलाचिया खंती । म्हणितलें या ज्ञप्ति । अर्वाचीना ॥ ४० ॥ हां हो परतत्त्वाआंतु । के प्रकृतीची मातु । हा क्षेत्रवृत्तांतु । उगेचि आइका || ४१|| शून्यसेजशाळिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती यें । संकल्पे येणें ॥। ४२ ।। तो अवसांत चेहला । उद्यमी सदैव भला । म्हणोनि ठेवा जोडला । इच्छावों ॥ ४३ ॥ निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी | रूपा आली ॥ ४४ ॥ मग महाभूतांचें एकवट । सैरा वेटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥ ४५ ॥ यावरी आदीं। पांचभूतिकांची मांदी | बांधली प्रभेदीं । पांचभौतिकी ॥ ४६ ॥ कर्माकर्माचे गुंडे | वांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥ ४७ ॥ तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहांविली निलागीं । संकल्प येणें ॥ ४८ ॥ मग अहंकारेंसी एकलाधी । करूनि जीवितावधि | वहाविलें बुद्धी । चराचर ।। ४९ ।। यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणोनि तो मूळी । प्रपंचा यया ॥ ५० ॥ ययापरि मतमुक्तकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं । म्हणती हांहो विवेकी । म्हणण्यास हरकत घेऊन, म्हटलें, कीं, " हे सगळे कोटिकम आलीकडचे आहेत. ४० अहो, परतत्त्व म्हणजे ब्रह्म; मग त्या ब्रह्मापुढें प्रकृतीची काय कथा आहे ? हा तुमचा क्षेत्रासंबंधींचा विचार ऐकणें म्हणजे कांहीं तरी व्यर्थ बडबड ऐकण्यासारखें आहे ! ४१ शून्य ब्रह्माच्या शेजघरांत लयावस्थेच्या फळीवर जो आदिसंकल्प झोंपलेला होता, ४२ तो एकाएकीं जागा झाला, आणि तो फार चळवळ्या असल्यामुळें त्यानें आपल्या इच्छेच्या लहरीप्रमाणें हा विश्वाचा सांगाडा बनविला. ४३ निर्गुण परब्रह्माची ओसाड जागा त्रिभुवनाएवढी मोठी होती; ती याच आदिसंकल्पाच्या करणीनें रंगारूपाला आली. ४४ मग महाभूतांचें जें एकजात अफाट पसरलेलें भाट होते, त्याचे चार रेखींव भाग पाडले; हे भाग म्हणजेच जारज, स्वेदज, अंडज, व उद्भिज्ज, असे भूतग्राम होत. ४५ यानंतर पंचमहाभूतांचा जो एक गट होता, तो फोडून, व त्याचे वेगवेगळे संत्र करून पांचभौतिक सृष्टि रचली गेली. ४६ मग कर्म आणि अकर्म हे दगडगोटे मिळवून दोन बाजूंना बांध घातले, आणि यांच्यामधील नापीक जमिनीचीं राने बनवली. ४७ या प्रदेशांत जा- ये सारखी चालावी म्हणून जन्म आणि मृत्यु हीं दोन भुयारे खणण्यांत आली. हीं भुयारं या सृष्टीपासून निरालंब ब्रह्मापर्यंत पोचावी, अशी त्यांची रचना या आदिसंकल्पानेच केली. ४८ मग या आदिसंकल्पाने अहंकाराशी संगनमत करून, बुद्धीच्या मध्यस्थीनें जीवितान्तापर्यंत या चराचर क्षेत्राची रात्ररात्रवण करण्याची योजना केली. ४९ अशा रीतीनें प्रथमतः निर्गुण निरालंब ब्रह्माच्या ठिकाणीं आदिसंकल्पाचा कांवटा फुटला, म्हणून या प्रपंचाचें मूळ तो संकल्पच ठरतो. " ५० याप्रमाणे संकल्पवाद्यांनी आपली मतरूपी मुक्ताफळें गाळली, तेव्हां त्यांच्यावर तणाणत दुसरे १ शून्याच्या शेजघरति. २ फळीवर. ३ एकाएकीं. ४ निराकार ब्रह्मतत्त्वाची. ५ बिभाग, भागाच्या ६ घोडे, गोटे. ७ नापीक. ८ भुयार, ९ सुरेख केली. १० निरालंय ब्रह्मापर्यंत. ५७