पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

કેટ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आवरी । कुळवाडीकरू ॥ २८ ॥ तयातें इंद्रियबैलांची पेटी' । न म्हणे अवसीं पाहाटीं । विषयक्षेत्री आटी । काढी भली ॥ २९ ॥ मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बीज वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥ ३० ॥ तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके । मग जन्मकोटि दुःखें भोगी जीवु ॥ ३१ ॥ ना तरी विधीचिये वाफे । सत्क्रिया वीज आरोपे । तरी जन्मशताची मापें । सुखचि मविजे ॥ ३२ ॥ तंव आणिक म्हणती हैं नव्हे । हें जिवाचिन म्हणावें । आमुतें पुसा आघवें । क्षेत्राचें या ॥ ३३ ॥ अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणोनि जागे ॥ ३४ ॥ अनादि हे प्रकृति । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ति । तियेचि जाणा ||३५|| आणि तियेतेंचि आघवा । आथी घरमेळावा | म्हणोनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥ ३६ ॥ वाचिये रहाटी । जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं । ते इयेच्या चि पोटीं । जहाले गुण ॥ ३७ ॥ रजोगुण पेरी । तेतुलें सत्व सोकरी । मग एकलें तम करी । संवर्गणी ॥ ३८ ॥ रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मैळी एके कांळुगेनि पोळं । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भाऊ कामकरी आहेत आणि मन हा त्यांच्या पाठीवर मुख्य कुळवाडी आहे. तो कुळवाडी दहा इंद्रियरूप बैलांचा पेटारा लावून अवस पहाट न म्हणतां निरंतर विषयांच्या शेतांत मेहनत करीत असतो. २९ अशा प्रकारें पेटारा लावून विषयांच्या मातीला ओढ लावल्यामुळे कर्तव्यकर्माचरणाचा उबारा उडून जातो, आणि मग तो कुळवाडी त्या उवाऱ्याला मुकून, अन्यायाचें वीं पेरतो व त्याला कुकर्माचें खत घालतो. ३० मग त्या बियाला व रावाला साजेल असेंच पापाचें आडमाप पीक येतें आणि त्यामुळे जीवास कोट्यवधि जन्मांचें दुःख भोगावें लागतें. ३१ परंतु, असें न करतां जर कर्तव्यकर्माचरणाचा उबारा कायम राखला आणि सत्कर्माचें वीं पेरलें, तर तोच जीव शेंकडों जन्मपर्यंत सुख भोगतो. " ३२ यावर दुसरे कित्येक म्हणतात, कीं, " असें मुळींच नाहीं. हें देहक्षेत्र जीवाचंच खास आहे, असें म्हणतां येत नाहीं. या क्षेत्रासंबंधें सर्व माहिती आम्हांलाच विचारावी. ३३ अहो, जीव हा एक केवळ उपरी प्रवासी आहे. हा प्रवास करीत असतां वाटेवर या क्षेत्रांत केवळ तात्पुरती वसती करतो. आणि प्राण हा बलुतेदार-वतनी कामगार आहे, म्हणून तो जाग राखून पहारा करतो. ३४ सांख्यशास्त्रांत जिला 'अनादि प्रकृति' म्हणतात ती या क्षेत्राची खरी वृत्तिवंत आहे. ३५ आणि हा सर्व घराचा प्रपंच तिचा आहे. म्हणून या क्षेत्राची लागवड तिच्या घरचे कामकरी करतात. ३६ या लागवडीचें काम करणारे जे अगदीं मूळचे या जगांत आहेत, ते तीन गुण याच प्रकृतीच्या पोटीं जन्मास आलेले आहेत. ३७ रजोगुण पेरणी करतो, सत्वगुण पिकाची राखण करतो, आणि तमोगुण या पिकाची लाणी करून तें आटोपतो. ३८ मग महत्तत्त्वाचें खच्टें तयार करण्यांत येतें, आणि एकट्या काळस्वरूपी बैलाकडून त्या पिकाची मटणी काढली जाते. या सुमारास अव्यक्ताची संध्याकाळ येऊन ठेपते. ३९ इतक्यांत दुसऱ्या कांहीं शाहण्यांनीं या १ शेत कसणारा. २ शेतांतली माती ओढण्याचा फळीचा पेटारा ३ पाव्हणा. ४ शेताची वाहणूक. ५ कसणुकीच्या. ६ राखण करतो. ७ लाणी व सांठवणी. ८ मळणी काढतो. ९ काळरूपी. १० खोंडाकडून.