पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ૪૪૭ परि कैसें अभिलापाचें बळ । जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥ १८ ॥ नास्तिका द्यावया तोंड । वेदांचें गाढें वंड । तें देखोनि पाखांड | आनचि वाजे ॥ १९ ॥ म्हणती तुम्ही निर्मूळ । लटिकें हैं वाग्जाळ | म्हणसी तरी पोफळ । घातलें आहे ॥ २० ॥ पाखांडाचे कडे | नागवीं लुंचिती 'मुंडें । नियोजिलीं वितंडें । तळासि येती ॥ २१ ॥ मृत्युवळाचेनि माजें । हें जाईल वीण काजें । तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥ २२ ॥ मृत्यूनि आधाधिले । तिहीं निर्जन सेविलें । यमनियमांचे केले | मेळावे पुरे ॥ २३ ॥ येणेंचि क्षेत्राभिमानें | राज्य त्यजिलें ईशानें । गुंती जाणोनि श्मशानें । वासु केला ॥ २४ ॥ ऐसिया पैजा महेशा । पांघरणें दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसा | कामु केला ॥ २५ ॥ पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं वळार्था । तरी तो सर्वथा । जाणोचना ॥ २६ ॥ ऋषिभिर्वहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४ ॥ सम० – ऋषीश्वरीं बहुविध वेर्दी करुनि वर्णिलें । युक्त सिद्धांतवचनीं ब्रह्मसूत्रीं करूनियां ॥ ४ ॥ आर्या - बहुधा वर्णित ऋषिंनीं सुज्ञानींही अनेकविध श्रुतिंत । तें ब्रह्मसूत्रपादें सहेतुकें निश्चयात्मक गीत ॥ ४ ॥ ओंवी—ऋषींहीं बहुतीं सांगितलें । वेद विधि बोलिले वेगळाले । उपनिषदीं निश्चित केलें । हें सत्य जाण ॥ ४ ॥ 66 या एक म्हणती हें स्थळ | जीवाचेंचि समूळ | मग प्राण हैं कूळ | तयाचें एथ॥ २७ ॥ जया प्राणाचे घरीं । अंगें रावती भाऊ चारी । आणि मनाऐसा कोणालाही उलगडलें नाहीं; पण अहंपणाची लालूच इतकी मातब्बर आहे, कीं, घरोघर याच विषयाचा काथ्याकूट चालू असतो ! १८ नास्तिकांना तोंड देण्याकरितां वेदांनीं मोठें अवडंबर माजविलें, तेव्हां पाखंड्यांनीं वेदांविरुद्ध भलतीसलतीच वाचाळता आरंभली. १९ पाखंडी म्हणतात, वेदांना मुळीं आधारच नाहीं, हे खोटेंच शाब्दिक जाळें पसरतात. आमचें म्हणणें खोटें म्हणत असाल, तर तें सिद्ध करण्याला ही आम्हीं प्रतिज्ञेची सुपारी ठेवली आहे; छाती असेल तर ती उचला, पाहूं ! " २० पाखंडीपणांत शिरून कित्येकांनीं वस्त्रत्याग करून डोई वोडल्या आहेत, तरी पण त्यांचे वितंडवाद आपोआपच त्यांना धूळ खावयाला लावतात ! २१ मृत्यूच्या सामर्थ्याच्या अचाटपणामुळें हैं देहक्षेत्र व्यर्थ जाईल, या भीतीनें योगी पुढे सरसावले. २२ मरणाला घाबरलेल्या त्या योग्यांनीं मनुष्यवस्तीपासून दूर अशा एकान्त ठिकाणीं राहून यमनियमांचें लिगाड पाठीशीं लावून घेतले. २३ याच देहक्षेत्राची विवंचना करण्यासाठीं श्रीशंकरांनी शिवलोकाचा त्याग केला आणि, जिकडे तिकडे उपाधि पाहून, केवळ श्मशानभूमीचा आश्रय घेतला. २४ शंकरांची प्रतिज्ञा तर इतकी कडक होती, कीं, नुसते दिगंबर हाऊन, काम-मदन- हा लांचकोडगा आहे म्हणून त्याची त्यांनी राखरांगोळी केली. २५ ब्रह्मदेवाचें सामर्थ्य वाढविण्याकरितां त्याला एकाऐवजीं चार तोंडें लाभली, तरीपण त्याला या विषयाचें मुळींच ज्ञान झालें नाहीं. २६ कोणी म्हणतात, कीं, "देहक्षेत्र ही मूळचीच जीवाची सर्वस्वीं शेत करणारें कूळ आहे. २७ या प्राणाच्या घरांत अपान, व्यान, १ डोई बोडतात. २ सामर्थ्य वाढवण्याकरितां. मत्ता आहे, आणि प्राण हा है समान, आणि उदान, हे चार