पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ २ ॥ सम० - क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रीं जो तोही मी जाण भारता । दोहींत जे ज्ञान त्याचे ज्ञान तें मज संमत ॥ २ ॥ आर्या-क्षेत्रज्ञ सर्व भूर्ती जो तो मी जाण न करिं अनुमान । क्षेत्रक्षेत्रज्ञाचं ज्ञानचि जें होय ते मला मान ॥ २ ॥ ओवी - क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही । दोहींचा जाणता म्हणोनी । तोचि म्हणजे ज्ञानी । तो मज मानला ॥ २ ॥ तरी क्षेत्र जो एथें । तो मी जाण निरुतें । जो सर्व क्षेत्रांतें । संगोपोनि असे ॥ ८ ॥ क्षेत्र आणि | जाणणें जें निरुतें । ज्ञान ऐसें तयातें | मानूं आम्ही ॥ ९ ॥ क्षेत्रज्ञातें तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् । स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥ ३ ॥ सम० - तें क्षेत्र जे जसें जाणे विकारी जें जयास्तव । क्षेत्रज्ञ जो ज्या प्रकार संक्षेपें तेंहि आइक ॥ ३ ॥ आर्या-तें क्षेत्र होय जेथुनि जया विकारें जसेंहि संक्षेपें । तूं ऐक ज्या प्रभावें युक्त क्षेत्रज्ञ हेंहि संक्षेपें ॥ ३ ॥ ओवी-तें क्षेत्र कैसे जाणिजे । आणि क्षेत्रज्ञ कासया म्हणिजे या दोहींचा निवाडा वोजें । संक्षेपें आइक ॥ ३॥ तरि क्षेत्र येणें नांवें । हैं शरीर जेणें भावे । म्हणितलें तें आघवें । सांगों आतां ॥ १० ॥ हें क्षेत्र कां म्हणिजे | कैसे के हैं उपजे । कवणकवणीं वाढविजे | विकारी एथ ॥ ११ ॥ हें औट हात मोटकें । कीं केवढें पां age | as a fur | कोणाचें हें || १२ || इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते वोलिजती सावेव । अवधान देई || १३ || पैं याचि स्थळाकारणें । श्रुति सदा वा । तर्कु येणेंचि ठीकैरणें । तोंडाळु केला ॥ १४ ॥ चाळितां हेचि बोली । दर्शनें शेवटा आलीं । तेवींचि नाहीं बुझविलीं । अझुनी दंदें ॥ १५ ॥ शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें । याचेनि एकवंकें । जगासि वादु ॥ १६ ॥ तोंडेंसी तोंडा न पडे । बोला बोलेंसी न घडे । इया युक्ति बडबडे । त्राय जाहली ॥ १७ ॥ नेणों कोणाचें हें स्थळ । पण या प्रसंगी जो ' क्षेत्रज्ञ,' तो मीच, हें निःसंदेह समज; कारण मीच सर्व क्षेत्रांना म्हणजे शरीरांना पोषीत असतों. ८ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, यांचें जें खरें ज्ञान, तेंच आमच्या मतें उत्तम 'ज्ञान' आहे. ९ आकाराचे आहे ? हें काय इत्यादि यासंबंधींचे जे जे आतां या शरीराला ' क्षेत्र' नांव देण्याचा उद्देश काय, तो सांगतों, ऐक. १० याला 'क्षेत्र ' कां म्हणतात, हें कसें व कोठें उत्पन्न होतें, आणि कोणकोणत्या विकारांनी याचा विस्तार होतो ? ११ हें क्षेत्र काय साडेतीन हात असें लहान आहे, की किती मोठे व कशा नापीक आहे, कीं सुपीक आहे ? याचा मालक तरी कोण आहे ? १२ प्रश्न आहेत, त्यांची सांगोपांग फोड करून सांगतों; तर इकडे लक्ष असूं दे. १३ अर्जुना, या प्रभाचाच उलगडा करण्याकरितां वेद बडबडत असतात, आणि तर्काची शाब्दिक टकळी चालू असते. १४ अरे, याचाच खल करतां करतां पद्दर्शनें टेंकीला आली, तरीही अजून त्यांचं कांहीं एकमत होत नाहीं ! १५ या विषयावर शास्त्रांशास्त्रांत तेढ पडते, आणि सर्व जगांत याच्याचबद्दल अखंड वादविवाद चालू आहेत. १६ यांत कोणाची तोंडमिळवणी होत नाहीं; मतांमतांचं पटत नाहीं, एकंदरीत ऊहापोहाचा गलबला उडून, नुसता घोंटाळा माजून राहिला आहे ! १७ क्षेत्राचा धनी कोण, हें १ नापीक. २ बडबडते. ३ व्यवस्था लावण्याच्या प्रयत्नानें, ४ एकमत करण्यासाठीं,