पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय तेरावा जयांचें केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण श्रीगुरूचे ॥ १ ॥ जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ २ ॥ वक्तृत्वा गोडपणें । अमृतातें पारुखें म्हणे । रस होती वोळंगणे । अक्षरांसी ॥ ३ ॥ भावाचें अवतरण | अवतरविती खूण | हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद ॥ ४ ॥ श्रीगुरूचे पाय । जैं हृदय विसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेषासी ॥ ५ ॥ ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥ ६ ॥ श्रीभगवानुवाच- इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥ सम० - देह हा क्षेत्र म्हणुनी कौंतेया म्हणिजे तसे । क्षेत्रज्ञ जो यासि जाणे तद्वेत्ते बोलती असे ॥ १ ॥ आर्या- तव शरीर पार्था वर्णियले क्षेत्र तत्ववेश्यांनीं । त्यातें जाणें बा जो तोचि क्षेत्रज्ञ बोलिला त्यांनीं ॥ १ ॥ ओवी - श्रीकृष्ण म्हणे पार्था परियेसीं । हें देह क्षेत्र जाणावें यासी । हें जाणे जो नेमेंसीं । तो क्षेत्रज्ञ जाणावा ॥ १ ॥ तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे | जो हैं जाणे तो बोलिजे । क्षेत्र एथें ॥ ७ ॥ ज्यांचे स्मरण केलें असतां, शिष्याच्या ठिकाणीं सर्व विद्या येऊन राहतात, त्या श्रीगुरुचरणांना मी वंदन करतो. १ ज्यांच्या स्मरणानें काव्यशक्ति अंगीं येते आणि जिव्हाग्रीं सर्वपरीचें रसाळ वक्तृत्व उपस्थित होते; २ ज्यांच्या स्मरणानें वक्तृत्वाच्या गोडपणापुढें अमृतही फिकें पड़तें आणि प्रत्येक अक्षरागणीक रस सेवेकऱ्यांप्रमाणें हात जोडून उभे राहतात; ३ आणि उद्दिष्ट अर्थाची खुलावट होऊन रहस्यज्ञानाचें वर्म कळतें व संपूर्ण आत्मबोध हाती पडतो, ४ असे श्रीगुरुचरण कवळून जेव्हां अंतःकरण स्थिर होतें, तेव्हांच ज्ञानप्रकाश एवढ्या वैभवाला चढतो. ५ म्हणून त्या गुरुचरणांना नमन केल्यावर, आतां, जगाच्या पितामहाचे म्हणजे ब्रह्मदेवाचेही जे जनक असे रमावल्लभ श्रीकृष्ण काय म्हणाले, तें सांगतों. ६ “ अर्जुना, श्रवण कर. देहाला ' क्षेत्र' असें नांव आहे; या क्षेत्राचें ज्ञान ज्याला होतें तो क्षेत्रज्ञ ' समजावा. ७