पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अनुवादती पांडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥ ३८ ॥ ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें | बोलिलें मुकुंदें | संजय म्हणे ॥ ३९॥ राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥ पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीछु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥ ४१ ॥ जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु | अतुलवळें प्रबळु । वळिवंधनु ॥ ४२ ॥ जो भक्तजनवत्सलु । प्रेमळ जनप्रांजलु । सत्यसेतु सकळ । कलानिधि ||४३|| तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवतीं निजांचा। सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥ ४४ ॥ आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें || ४५|| तेचि रसाळ कथा । मन्हाटिया प्रतिपथा । आणिजेल आतां । अवधारिजो ॥४६॥ ज्ञानदेवो म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्हीं । हें पढविलों जी स्वामी | निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥ 66 अशा प्रेमळ भक्ताच्या कथा जे गातात, त्यांना आम्हीं श्रेष्ठ देवतांप्रमाणें मान देतों. " ३८ असें भक्तांना आनंद देणारे व सर्व जगाचें मूळ कारण असणारे भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला बोलले. हें सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ३९ 'राजा धृतराष्ट्रा, जे भगवान् कृष्णदेव शुद्ध, दोषहीन, दयाळू, शरणागताचे प्रतिपालक, व रक्षक, आहेत, २४० जे देवांना नेहमीं साह्य करतात, लोकांचें लालनपालन करतात, आणि जंगाचा प्रतिपाळ हाच ज्यांचा निरंतरचा खेळ आहे, ४१ ज्यांचें पवित्र यश अत्यंत निर्मळ आहे, जे सरळ व अपरंपार उदार आहेत, ज्यांचें बळ अमर्याद, आणि जे बलिनांना आपल्या कह्यांत आणल्यावांचून सोडीत नाहींत, ४२ जे भक्तांचे कनवाळू, प्रेमळांचे स्नेहाऴ्, सत्याचे कैवारी, आणि सर्व कलाकौशल्याचे आगर आहेत, ४३ ते भक्तांचे सम्राट्, वैकुंठाधिपति श्रीकृष्ण स्वतः असें वक्तृत्व करीत होते, आणि तो दैवशाली अर्जुन तें ऐकत होता. ४४ आतां यानंतरची कथा निरूपण करतों, ती ऐक. " असें संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ४५ तीच संजयानें सांगितलेली रसाळ कथा मराठी भाषेत कथन करण्यांत येणार आहे; तरी श्रोत्यांनी अवधान द्यावे. ४६ श्रीनिवृत्तिनाथशिष्य ज्ञानदेव श्रोत्यांस प्रार्थना करितो, कीं, " महाराज, तुम्हां संतजनांना शरण जाऊन तुमची सेवा करावी, हेंच आम्हांला स्वामी निवृत्तिदेवांनीं शिकविलें आहे. " २४७ 10000000000000000