पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला १९ परि कांहीं आश्चर्य असे ॥ ७८ ॥ ऐसी पुढील से घेतु । तो सहज जाणे हृदयस्थ । परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥ ७९ ॥ तंव तेथ पार्थ सकळ । पितृपितामह केवळ | गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥ १८० ॥ इष्टमित्र आपुले | कुमरजन देखिले । शालक असती आले । तयांमाजीं ॥ ८१ ॥ सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ ॥ ८२ ॥ जयां उपकार होते केले । कीं आपढ़ीं जे रक्षिले । हे असो वडील धाकुले | आदिकरुनी ॥ ८३ ॥ ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळी । तें अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥ ८४ ॥ तेथ मनीं गजवज जाहली । आणि आपसी कृपा आली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥ ८५ ॥ जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥। ८६ ॥ नविये आवडीचेनि भरें। कामुक निज वनिता विसरे । मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥ ८७ ॥ कीं तपोवळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी | मग तया विरक्ततासिद्धि | आठवेना ॥ ८८ ॥ तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जें अंतःकरण दिधलें । कारु- प्यासी ॥ ८९ ॥ देखा मंत्रज्ञ बरळु जाये । मग तेथ का जैसा संचारु होये । जाणे ! पण कांहींतरी आले आहे खरें !” ७८ याप्रमाणें पुढील गोष्टीची मनांत घोळणा करीत असतां त्या सर्वान्तरगामी भगवन्तांनीं सर्व जाणलें, परंतु ते त्या वेळीं स्तब्धच राहिले. ७९ इकडे अर्जुनाच्या दृष्टीस सर्व गुरुजन, आजोबा, आचार्य, गोत्रज, मामे, इत्यादि पडले. १८० आपले इमित्र, त्याप्रमाणेच आपल्या कुळांतील तरुण मुलगेही, त्याने पाहिले. या मंडळींत त्याचे मेव्हणेही आले होते. ८१ जिव्हाळ्याचे स्नेही, सासरे, दुसरे सगेसोइरे, मुलगे, व नातूही, अर्जुनाला त्या गर्दीत दिसले. ८२ ज्यांच्यावर आपण उपकार केले किंवा ज्यांना आपण संकटांत बचाविलें, असेच नव्हत, तर वडील, धाकटे, इत्यादि सर्वच तेथे होते. ८३ अशा रीतीनें दोन्ही सैन्यांत युद्धाला सिद्ध झालेला आपला स्वतःचा गोतावळाच अर्जुनाला दिसून आला. ८४ त्यामुळे अर्जुनाचें मन गडबडलें, त्याच्या अन्तःकरणांत दयेचा उद्भव झाला, आणि " दयेचा उद्भव म्हणजे आपला अपमानच आहे, " असे वाटूनच जणूं काय वीरवृत्ति अर्जुनाच्या अन्तःकरणाला सोडून गेली, ८५ कारण, उत्तम कुलीन व गुणलावण्यवती अशा स्त्रियांना, आपल्याच घरांत परक्या स्त्रीचा पगडा बसावा, हें कधींच सहन होत नाहीं. ८६ एकाद्या नव्या स्त्रीच्या आवडीच्या भरांत कामी पुरुष जसा आपल्या धर्मपत्नीला विसरतो आणि मग भ्रमिप्रासारखा बेताल चवचालपणा करितो, ८७ किंवा तपाच्या सामर्थ्याने वैभवाची भरभराट झाली असतां जशी बुद्धि फिरते आणि मग मनुष्याला वैराग्यसाधनाची आठवणही राहात नाहीं, ८८ तसेच अर्जुनाचें झालें, कारण त्यानें नांदतें वीरत्व हांकून दिलें, आणि आपलं अन्तःकरण करुणपणाच्या स्वाधीन केलें. ८९ अहो, जसा मांत्रिकानें मंत्रोच्चारांत प्रमाद आणि मग त्यालाच उलट भूत झांबावें, तसाच त्या धनुर्धर अर्जुनावर महामोहाचा पगडा १ अमर्यादपणे २ वारें भृताची झपाटणी, करावा,