पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४४३ हैं निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २७ ॥ जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोग समस्त । योगरूप ॥ २८ ॥ जेणें मी प्रीति करीं । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी | जया स्थितिये ॥ २९ ॥ ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ ६० ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः । सम० - बोलिल्याच परी जॅ हॅ धर्म्यामृत उपासिती । श्रद्धालु थोर मी ज्यांला भक्त ते बहु मस्प्रिय ॥ २० ॥ आर्या-पार्था हें धर्म्यामृत यथोक्त सद्भक्त यास जे भजती । विश्वासू मत्पर ते प्रीति तयांची असेच मज बहुती ॥ २० ॥ ओवी - हें धर्म्यामृत । याची उपासना करित । तो जाण जीवन्मुक्त । माझा भक्त पैं ॥ २० ॥ ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥ २३० ॥ तैसी चि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥ ३१ ॥ परि निरूपिली जैसी । तैसी स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥ ३२ ॥ परि मातें परम करूनि । इये अर्थी प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ ३३ ॥ पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥ ३४॥ ते तीर्थ ते क्षेत्र । जगीं तेचि पवित्र । भक्तिकथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥ ३५ ॥ आम्ही तयांचें करूं ध्यान । ते आमुचे देवतार्चन । तेवांचूनि आन । गोमटं नाहीं ॥ ३६ ॥ तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तें ॥ ३७ ॥ पैं प्रेमळाची वार्ता । जे तेही मला प्राणापेक्षां जास्त आवडतात, यांत संदेह नाहीं. २६, २७ 'भक्तियोग ' नांवाचा सर्वश्रेष्ठ योग आज साग्र कथन केला आहे, २८ प्रिय मानतों, किंवा त्याचं ध्यान करतों, अथवा त्याला मस्तकीं धारण एवढे थोर सामर्थ्य आहे, २९ अर्जुना, तुला मी जो हा ज्या योगामुळे मी भक्ताला करतों; ज्या योगाच्या अंगीं त्या योगाची ही मनोहर, पवित्र, व अमृतधारेसारखी गोड गोष्ट जे ऐकून अनुभवाला आणतात, २३० तसेंच अत्यंत श्रद्धेच्या आवडीनें ज्यांच्याठायीं ती विस्तार पावते; आणि ती निरंतर हृदयांत वागवून जे आचरणांत आणतात; ३१ मात्र, वर सांगितल्याप्रमाणें तंतोतंत मनाची स्थिति झाल्यामुळे सुपीक जमिनीत पेरलेल्या बियाण्यासारखें उत्तम फळ मिळालें असतांही जे मला अत्यंत श्रेष्ठ समजतात व माझ्या भक्तीविषयों प्रेम बागवून तिलाच आपले सर्वस्व मानतात; ३२, ३३ अर्जुना, तेच या जगांत खरे भक्त, आणि खरे योगी. त्यांचीच मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. ३४ ज्या पुरुषांना भक्तिकथेचा प्रेमळ छंद लागला आहे, तेच तीर्थ, तेच क्षेत्र, तेच या जगांत खरे खरे पवित्र ! ३५ आम्ही त्यांचंच ध्यान करतो; तेच आमचे देवतार्चन, त्यांच्यापेक्षां चांगले असे आम्हांला कांहींच दिसत नाहीं. ३६ आम्हांला त्यांचाच नाद, तेच आमचे द्रव्याचे ठेवे, किंबहुना, असे भक्त लाभल्याशिवाय आमच्या जीवाला समाधान होत नाहीं. ३७ अर्जुना,