पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४३ सार्थ श्रीज्ञानेश्वरी खालविजे हैं काय कौतुक । परि मानु करिती तीन्ही लोक | पायवणियां ।। १५ ।। तरि श्रद्धावस्तूसि आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु | सदाशिवु ॥ १६ ॥ परि हें असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति तत्त्वता । संचारु असे ॥ १७ ॥ ययालागीं हैं नोहे । म्हणितलें रमाना है | अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥ १८ ॥ जे पुरुषार्थसिद्धि चौथी | घेऊनि आपुलिया हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥ १९ ॥ कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडीबांधी करी । कीं जळाचिये परी | तळवटु घे ॥ २२० ॥ म्हणोनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुकुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्ही ॥ २१ ॥ तयाचिया गुणांची लेणीं । लेववूं आपुलिये वाणीं । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्ही लेऊं ॥ २२ ॥ तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पूजूं तयातें ॥ २३ ॥ दोंवरी दोनी | भुजा आलों घेउनी । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥ २४ ॥ तयासंगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥ २५ ॥ तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र । परि तयाचें चरित्र | ऐकती जे ॥ २६ ॥ तेही प्राणापरौते । आवडती आर्य कसले ? पण त्रिभुवनही ज्याच्या पायाचें तीर्थ बहुमानानें मस्तकीं धरितें, असाही मी श्रद्धावान भक्ताचा आदर किती करतों, हें बरोबर समजण्याला सदाशिवच सद्गुरु कला पाहिजे. १५, १६ परंतु हें कथन इतकेंच पुरे. कारण श्रीशंकराची थोरवी वर्णन करतांना वास्तविक ती स्वतांचीच स्तुति होऊन गर्व केल्यासारखं होतें. म्हणून, " रमापति कृष्ण म्हणाले, " या गोष्टीचा उल्लेख मी करीत नाहीं. परंतु इतकेंच सांगतों कीं, अर्जुना, अशा भक्ताला मी मस्तकीं धारण करतों; १७, १८ चवथा पुरुषार्थ जो मोक्ष, त्याला आपल्या हातांत घेऊन, तो भक्तिमार्गात शिरतो आणि तो मोक्ष सर्व जगाला देऊ लागतो. १९ तो कैवल्याला आपल्या हातांत आणतो आणि मोक्षरूपी द्रव्याची खुशाल सोडबांध करतो, तरीपण तो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणें तळाचें स्थान पत्करतो म्हणजे नम्रता स्वीकारतो; २२० म्हणून आम्हीं अशा भक्ताला नमन करतो, त्याला मुकुटासारखे मस्तकावर वागवतों, त्याची लाथही वक्षावर मिरवतों. २१ त्याच्या गुणवर्णनानें आम्ही आपल्या वाणीला भूपवतों, आणि त्याच्या गुणश्रवणांची कुंडलें आम्ही आपल्या कानांत घालतों. २२ अशा भक्ताचं दर्शन घडावें, अशा मनाचे ओढीनें तर मी अचक्षु असतांही डोळस झालो. या हातांतील भूषणभूत कमळाने मी त्याची पूजा करतों. २३ दोहोंवर आणखी दोन भुजा घेऊन मी आलों आहे तो तरी अशा भक्ताला एकदम दोन्ही बाजूंनीं आलिंगन देण्याकरितांच आलों आहे. २४ अशा भक्ताच्या संगतिसुखासाठीच मी देहहीन असतांही देहधारी होतों. एकंदरीत असा भक्त मला किती आवडतो, हें कोणत्याही उपमेनें सांगतां येण्यासारखें नाहीं ! २५ आमची त्याच्याशी निर्मळ मैत्री आहे, यांत आश्चर्य कसलें ? अरे, जे अशा भक्ताचें चरित्र ऐकतात किंवा गातात,