पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा vee जो सकळिकां । भूतां समु ॥ ४ ॥ आघविया जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें जयातें तीन्ही लोक । आकांक्षिती ॥ ५ ॥ जो सवाह्यसंग | सांडोनियां लाग । एकाकी असे आंग । आंगीं सूनी ॥ ६ ॥ तुल्यनिन्दास्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नः ॥ १९ ॥ 'सम० - मानी निंदा स्तुती तुल्य तुष्ट लार्भे जशा तशा निराश्रय स्थिरमती आणि मद्भक्त तो प्रिय ॥ १९ ॥ आर्या - निंदा स्तुति तुल्य जया गेह त्यागोनि भक्तिला सजला । संतुष्ट यथालाभे मौनी स्थिरबुद्धि तो रुचे मजला ॥१९॥ ओवी - स्तुति निंदा समानी । आत्मलाभ संतोष दोन्ही । निराश्रय स्थिर होऊनी । जो राहे तो माझा भक्त ॥ १९ ॥ जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ ७ ॥ तैसें निंदे आणि स्तुती । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ति । जनींवनीं ॥ ८ ॥ साच लटिकें दोन्ही । न वोले जाहला मौनी । जो भोगितां उन्मनी | आराना ॥ ९ ॥ जो यथालाभें न तोखे । अलामें न पारुखे । पाउसेंवीण न सुके । समुह जैसा ॥ २९० ॥ आणि वायूसि एके ठायीं । विदार जैसें नाहीं । तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥ ११ ॥ आघवांचि आकाशस्थिति । जेविं वायूसि नित्यवस्ती । तेविं जगचि विश्रांति - । स्थान जया ॥ १२ ॥ हें विश्वचि माझें घर । ऐसी मति जयाची स्थिर | किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ १३ ॥ मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था । तरि तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ १४ ॥ उत्तमासि मस्तक | राजाला आणि दरिद्र्याला चांदणें सारखेंच गोड लागतें, तसा जो सर्व भूतमात्राशीं या समभावानें वागतो; ४ सर्व जगाला जसें पाणी हवेंसें असतें, तसाच जो त्रिभुवनाला हवासा वाटतो; ५ जो अंतर्बाह्य विषयाभिलाषाचा संग सोडून आपल्याला आपल्याच ठिकाणीं रममाण करून निवांत होतो; ६ जो निंदा मनास आणीत नाहीं किंवा स्तुतीनें आनंदित होत नाहीं; जसें आकाश मेघादिकां - पासून निर्लेप राहातें, तसा जो, निंदेला आणि स्तुतीला एकाच पंक्तीला बसवून, जनांत तसाच निर्जन वनांतही, अचंचळ वृत्तीनें वावरतो; ७,८ जो ' खरें, खोटें', असें कांहीं एक न बोलतां मौन सेवतो, आणि 'उन्मनी' नामक ब्रह्मस्थितीचा अनुभव घेत असतां, कधीहि विमुख होत नाहीं; ९ जसा पाऊस पडला नाहीं म्हणून समुद्र कोरडा होतो असें कधींहि घडत नाहीं; तसा जो, लाभ झाला असतां, आनंदानें फुगत नाहीं, किंवा हानि घडली असतां दुःखाने खंगत नाहीं; २१० आणि जसा वारा कोणत्याही एका ठिकाणीं खिळून राहात नाहीं, तसा जो कोठेही डकून अडकून जात नाहीं; ११ आणि जसा वायु निरंतर आकाशांत सर्वत्र असतो, तसा जो हे सर्व जगच आपल्या विश्रांतीचें स्थान करतो; १२ ' हैं विश्वच माझं घर आहे, ' अशा ज्ञानानें ज्याच्या मनाला स्थैर्य आलें आहे; किंबहुना जो, यच्चयावत् चराचर आपणच स्वतः आहों, असें जाणतो ; १३ आणि, पार्था, अशा स्थितीला पोंचूनही ज्याला माझ्या भक्तीची गोडी व श्रद्धा आहे, त्याला मी आपल्या मस्तकीं मुकुट्टाप्रमाणें धारण करतों. १४ उत्तमापुढें मस्तक लववावें, १ परता होत नाही. ५६