पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४० सार्थ श्रीज्ञानेश्वरी जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ ९३ ॥ वोखटें कां गोमटें । हें कांहींचि तया नुमटे | रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥ ९४ ॥ ऐसा वोधुचि केवळु । जो होऊनि असे निखळ । त्याहीवरी भजनशील | माझ्याठायीं ॥ ९५ ॥ तरि तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥९६॥ समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥ सम० - शत्रुभित्री सम तसा सन्मान अपमानिंही । शीत उष्णीं सुखीं दुःखीं समधीर असंग जो ॥ १८ ॥ आर्या-सम शत्रु मित्र ज्याला समान तैसाचि मान अपमानीं । त्यागी जो संगातें शीतोष्णीं सौख्य दुःख सम मानी १८ ओवी - जया शत्रुभित्र समान जाण । नाहीं मान आणि अपमान । शीत उष्ण सुख दुःख समान । जया आसक्तता नाहीं १८ पार्थी जयाचिया ठायीं । वैपम्याची वार्ता नाहीं । रिपु मित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥ ९७ ॥ कां घरींचियां उजियेडु करावा | पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥ ९८ ॥ जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥९९॥ ना तरी इक्षुदंड | पाळितया गोड । गाळितया कडु | नोहेचि जेवीं ॥ २०० ॥ अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानी सरिसा । होतु जाय ॥ १ ॥ तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया || २ || दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पांडुसुता । तैसा सुखदुखःप्राप्तां । मध्यस्थु जो || ३ || माधुर्ये चंद्रिका | सरिसी राया रंका । तैसा कल्पांतही नष्ट व्हावयाचें नाहीं, या विश्वासानें जो झाल्यागेल्या लौकिक गोष्टींचा शोक करीत नाहीं ; ९२ आणि ज्या वस्तूपेक्षां अधिक असें कांहींच नाहीं, ती आत्मस्वरूपी वस्तू आपल्याच ठाय लाभल्यामुळे जो कशाचीही इच्छा करीत नाहीं; ९३ जशीं सूर्याला रात्रिदिवस हीं कधींच घडून येत नाहींत, तसाच चांगलें व वाईट हा भेद ज्याला कधींच भासमान होत नाहीं ; ९४ असा जो प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच बनला आहे आणि तशांतही जो माझा प्रेमळ भक्त आहे; ९५ त्या भक्तासारखं आम्हांला दुसरें कांहींच प्रिय नाहीं; तुझी शपथ हें सर्व मी खरेंखरें सांगत आहे. ९६ अर्जुना, ज्याच्यामध्ये विषमभाव मुळींच नाहीं, जो शत्रूंना व मित्रांना सारखेच लेखतो; ९७ दिव्याप्रमाणेच जो, 'घरच्यांना उजेड करावा, आणि परक्यांना अंधार पाडावा,' असें कधींही मनांत आणीत नाहीं; ९८ कोणी एक कुन्हाडीचा घाव घालून झाडाला तोडूं लागतो, दुसरा कोणी बी पेरून झाडाची लावणी करतो, पण झाड जसे त्या दोघांनाही एकच शीतळ सावली देतें; ९९ किंवा ऊंस जसा पाणी घालून आपल्याला वाढविणाऱ्या शेतकऱ्याला गोड, आणि चरकांत घालून पिळणाऱ्या गुन्हाळवाल्याला कड्डू, लागत नाहीं, तर दोघांनाही सारखाच गोड लागतो; २०० तसाच शत्रूंशीं व मित्रांशीं जो एकाच समभावानें वागतो, मान व अपमान हेही जो सारखेच मानतो; १ तीन्ही ऋतूंत जसें आकाश एकरूपच असतें; तसा शीतोष्णादि द्वंद्वांत जो एकरूपच राहतो; २ दक्षिणवायु व उत्तरवायु या दोहोंच्या मध्यंतरी जसा मेरु पर्वत अचळ व अविकृत राहतो, तसाच जो साहजिक प्राप्त झालेल्या सुखःदुःखांच्या मध्यंतरीं अचळ व विकारहीन असतो, ३