पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४३९ गतायुषं । लज्जा जेवीं ॥ ८२ ॥ आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृति नाहीं आंगी। जैसें निरिंधन आगी । विझोनी जाय ॥ ८३ ॥ तैसा उपशमुचि भागा। जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥ ८४ ॥ अर्जुना हा ठावोवरी । जो सोहंभावो सरोभरी । द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला ॥ ८५ ॥ कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोहीं भागीं । वांटुनियां आंगीं । सेव वा ॥ ८६ ॥ येरा नाम मी ठेवी | मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ॥ ८७ ॥ तयाचें आम्हां व्यसन | आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ ८८ ॥ तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज एथें असणें । तया लोण कीजे जीवेंप्राणें । ऐसा पढिये ॥ ८९ ॥ यो हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः ॥१७॥ सम० – न हर्षे न करी द्वेष वांछा शोक न जो करी । टाकी शुभाशुभ आणि भक्त मत्प्रिय तो नर ॥ १७ ॥ आर्या - हर्ष द्वेष नसे ज्या न करी शोक स्पृहा महाघोर। टाकी शुभाशुभां जो प्रिय मजला भक्तियुक्त तो थोर ॥ १७ ॥ ओवी - नाहीं हर्ष ना द्वेषशोक । न करी कांक्षेचें सुख । शुभअशुभ त्यागी देख । तो भक्त मज प्रिय ॥ १७ ॥ जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणोनि भोगविशेखें। हरिखेजेना ॥ १९० ॥ आपणचि विश्व जाहला । तरि भेदभावो सहजचि गेला । म्हणोनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥ ९९ ॥ पैं आपुलें जें साचें | तें कल्पांतीही न बचे । हें जाणोनि गताचें । न शोची जो ।। ९२ ।। आणि ज्याला कधीही लज्जा शिवत नाहीं; ८२ आणि कोणतेंही कर्म आरंभण्याविषयीं ज्याला अहंकाराची बाधा होत नाहीं; सर्पण मिळालें नाहीं म्हणजे जसा अग्नि आपोआप विझतो, ८३ तशी मोक्षप्राप्तीला अवश्य अशी सहज शांति ज्याच्या वांट्याला आली आहे, ८४ अर्जुना, इतक्या पल्लुचाला येण्यापुरता जो ब्रह्मैक्यभावानें ओतप्रोत भरला आहे, व द्वैताच्या पलीकडल्या तीराला पोंचला आहे; ८५ अथवा, मुक्तिसुखाचा अनुभव भोगण्यास मिळावा म्हणून जो आपणच द्विधा होतो, आणि आपल्याच एका भागाला सेवकपणाचा दंडक घालून देतो; ८६ दुसऱ्या भागाला जो 'मी ' म्हणजे 'देव' हें नांव देतो; आणि मग भक्तिहीनांना जो योगी भक्तीचें कौतुक प्रत्ययास आणून देतो; ८७ अशा भक्ताचा आम्हांला मोठा छंद आहे; आम्ही अशा भक्ताचें ध्यान करीत असतों; किंबहुना, असा भक्त लाभला म्हणजेच आम्हांला समाधान वाटतें. ८८ त्याच्यासाठी आम्ही सगुण रूप धारण करतों, त्याच्यासाठी आम्ही जगांत वावरतों, आणि त्याच्यावरून आम्ही लिंबलोण ओवाळून टाकावे इतका तो आम्हांला प्रिय असतो ! ८९ जो आत्मस्वरूप प्राप्तीसारखें कांहींच उत्तम मानीत नाहीं, आणि म्हणून ज्याला कोणत्याही विषयोपभोगापासून आनंद होत नाहीं; १९० 'मीच सर्व विश्व आहे' या ज्ञानानें सहजच भेदभाव नष्ट झाल्यामुळे ज्या पुरुषामध्ये द्वेष उरलेला नाहीं; ९१ आपलें जें खरें खरें तत्त्व आहे, तें १ ज्याला इंधन ( सर्पण ) नाही तो.