पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दुःख जाणणें । नाहीं जया ॥ ४९ ॥ तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसी पवाडु आंगीं । संतोषा उत्संगीं । दिधलें घर ।। १५० ॥ संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । मध्यर्पितमना बुद्धियों मे भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥ सम० - संतृप्त सर्वदा योगी स्थिरचित्त दृढव्रत । मजमाज मनोबुद्धि असा मद्भक्त मप्रिय ॥ १४ ॥ आर्या - संतत योग करी जो मनोजयानें सदैव संतुष्ट | अर्प मन बुद्धि मला दृढ निश्चय भक्त जो मला इष्ट ॥ १४॥ ओवी - योगी तृप्त सुर्खेसीं । स्थिर करूनि मनासी । मजमाजि मनबुद्धि अर्पी नेमेंसीं । तोचि भक्त मम प्रिय ॥ १४ ॥ वायेिवीण सागरु | जैसा जळें नित्य निर्भरु | तैसा निरुपचारु । संतोपी जो ॥ ५१ ॥ वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचेनि ॥ ५२ ॥ जीवु परमात्मा दोनी । वैसोनियां ऐक्यासनीं । जयाचिया हृदयभुवनीं । विराजती ॥ ५३ ॥ ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि | अर्प मनोबुद्धि | माझ्याठायीं ॥ ५४ ॥ आंतु वाहेरि योगु । निर्वाळलेयाही चांगु । तरि माझा अनुरागु । सप्रेम जया ।। ५५ ।। अर्जुना तो भक्त । तोचि योगी तोचि मुक्त | तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥ ५६ ॥ हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें । हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥ ५७॥ तरी पढियंतयाची कहाणी । हे भुलीची भारणी । इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ॥ ५८ ॥ म्हणोनि गा आम्हां । वेगा आली उपमा । एन्हवीं काय प्रेमा | अनुवाद असे ।। ५९ ।। आतां असो हैं किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ।। १६० ।। तयाहीवरी विपायें | प्रेमळु ज्याला सुखदुःखाची जाणीव जाचत नाहीं; ४९ तसेंच सर्वसहा पृथ्वीच्या तोलाची क्षमा ज्याच्या अंगी असते, व जो संतोषाला निरंतर आपल्या मांडीवर नांदवितो; १५० जसा पावसाच्या वर्षावावांचून समुद्र नेहमीं तुडुंब भरलेला असतो, तसा जो आपोआप संतोषाने ओतप्रोत भरून राहतो; ५१ जो आपल्या अंतःकरणाला प्रतिज्ञेनें स्वाधीन ठेवतो आणि ज्याचा निश्चय अखंड टिकतो; ५२ जीव आणि शिव, हे पूर्ण ऐक्यानें ज्याच्या ठिकाणी एकत्र वास करतात; ५३ याप्रमाणें योगयुक्त होऊन जो आपले मन व बुद्धि मला सर्वस्वी अर्पण करतो; ५४ अंतर्बाह्य योग उत्तम रीतीनें दृढावल्यामुळें, जो माझ्या प्रेमळ भक्तीनें रंगून गेला आहे; ५५ अर्जुना, तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्त, समजावा. अरे, जशी पतीला पत्नी प्राणप्रिय होते, तसाच तो भक्त, मला प्राणप्रिय होतो. ५६ इतकेंच नव्हे, तर, “ तो मला प्राणासारखा प्रिय असतो, " या उपमेनेही त्या प्रेमाचं स्वरूप पुरतें स्पष्ट होत नाहीं. ५७ पण, ही प्रेमाची कथा म्हणजे एक जादूची भुरटच आहे. ही खरोखर शब्दांनीं सांगतांच येत नाहीं. परंतु हे थोडेंसें वर्णन केवळ श्रद्धावाने केले आहे; ५८ आणि म्हणूनच ही पतिपत्नीप्रेमाची उपमा एकदम ओंटाबाहेर आली; परंतु या निःसीम प्रेमाचें वास्तविक वर्णन करणें शक्यच नाहीं. ५९ पण, अर्जुना, आतां, हें पुरे झाले, कारण प्रिय भक्ताचा विषय निघाल्यामुळे माझ्या भक्तप्रेमाला एकदम दुप्पट जोर तें उसळं लागलें आहे. १६० तशांत जर कदाचित् श्रोताही प्रेमळ मिळाला, तर मग त्या