पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४३५ यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥ ३९ ॥ म्हणोनि यावया शांति | हाचि अनुक्रमु सुभद्रापति । म्हणोनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥ १४० ॥ श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद् ध्यानं विशिष्यते । ध्यानात्कर्मफलःयागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् सम० - अभ्यासाहूनि विश्वात्म-ज्ञान तें ध्यान त्याहुनी । श्रेय कर्म-सुख त्याग मम मुक्ति जितां मग ॥ १२ ॥ आर्या - ज्ञानहि अभ्यासाहुनि शुभकर तें ध्यान त्याहुनीहि पर । त्या हुनि कर्म-फळाचा त्याग त्यागेंचि शांति या उपर ॥१२॥ ओवी - अभ्यासाहूनि ज्ञान श्रेष्ठ । ज्ञानाहूनी ध्यान वरिष्ठ ध्यानाहुनी त्याग वरिष्ठ । तो जीवन्मुक्त कीं ॥ १२ ॥ अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ ४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥। ४२ ।। ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा | शांतीचा माजिवटा । टाकिला जेणें ॥ ४३ ॥ अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥ समन करी सर्व भूतांचा द्वेष मैत्र दयाळु जो मी माझें न जया दुःख-सुख तुल्य क्षमा जया ॥ १३ ॥ आर्या - मैत्र क्षमी सदयही सर्वां भूर्ती सदैव अद्वेष्टा । निर्मम निरहंकारी ज्याची दुःखीं सुखींहि सम चेष्टा ॥ १३ ॥ ओवी - सर्वभूर्ती द्वेष नाहीं । मैत्री दयाळु पाहीं । सुखदुःखातेंही । समसमान मानीतसे ॥ १३ ॥ जो सर्वभूतांच्या ठायीं । द्वेपातें नेणेंचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥ ४४ ॥ उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हें कांहींचि नेणिजे | वसुधा जेवीं ॥ ४५ ॥ कां रायाचें देह चाळूं । रंका परौतें गाळूं । हैं न म्हणे कृपाळू । प्राणु पैं गा ॥ ४६ ॥ गाईची तृपा हरूं । कां व्याघ्रा विप होऊनि मारूं । ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥ ४७ ॥ तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री | कृपेसी धात्री । आपणचि जो ॥ ४८ ॥ आणि मी हे भाप नेणे । माझें कांहींचि न म्हणे । सुख फलत्यागाने आपल्याला अखंड शांति प्राप्त होते. ३९ तेव्हां, अर्जुना, शांतीच्या लाभाचा हा पायन्यपाय-यांचा मार्ग आहे, म्हणून आतां अभ्यासाचा अंगीकार करावा हेंच योग्य. १४० अर्जुना, अभ्यासापेक्षां ज्ञान वरचढ, ज्ञानापेक्षां ध्यान वरचढ, ध्यानापेक्षां कर्मफलत्याग वरचढ, आणि फलत्यागापेक्षां शांतिसुखाचा लाभ वरचढ, अशी या मार्गातील चढती परंपरा आहे; आणि, पार्था, याच टप्यांटप्यांनी शांतीचा ब्रह्मानंदाचा ठाव गांठतां येतो. ४१, ४२, ४३ जो कोणाही भूतमात्राचा द्वेष करीत नाहीं, ज्याला चैतन्याप्रमाणें ' हा आपला व हा परका, असा भेदभाव शिवत नाहीं; ४४ उत्तमाला आधार द्यावा आणि नीचाला लोटून द्यावा, असा विचार जसा भूमातेच्या मनांत कधीं येत नाहीं, तसाच तो ज्याच्या मनांत येत नाहीं; ४५ 66 राजाच्या शरीरांत राहीन पण दरियाच्या शरीराला स्पर्श करणार नाहीं, " असें जसें प्राणवायु कधीं म्हणत नाहीं, त्याचप्रमाणें जो अशी भेदभावना मनांत न आणतां, निरंतर सर्वाविषयीं कृपाळू असतो, ४६ पाणी जसें " गाईची तहान भागवीन, पण वाघाला विष होऊन मारीन, " असें कधी म्हणत नाहीं, ४७ तसें जो सर्व प्राणिमात्राला एकरूप समजून त्यांच्याशी मैत्री करतो व समभावानें कृपाळू होतो; ४८ आणि ज्याला, 'हा मी व हें माझें, ' अशी भाषाही माहीत नसते;