पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४३७ संवादिया होय । तिये गोडीसी आहे । कांटाळे मग ॥ ६१ ॥ म्हणोनि गा पांडुसुता । तूंचि प्रिय आणि तूंचि श्रोता । वरि प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥ ६२ ॥ तरि आतां वोलों । भलेयां सुखा मीनलों । ऐसें म्हणतखेवीं डोलों | लागले देवो ॥ ६३ ॥ मग म्हणे जाण । तया भक्ताचें लक्षण | जया मी अंतःकरण | वैसों घालीं ॥ ६४ ॥ यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥ सम० न ज्यास्तव भिती लोक लोकांपासूनि जो न भी। हर्ष क्रोध त्रास चिंता नसे तोही मज प्रिय ॥ १५ ॥ आर्या - भीती लोक न ज्याला लोकां भीतो न जो मला भजतो । हर्ष क्रोध भय अणी उद्वेगें मुक्त आवडे मज तो ॥१५॥ ओवी - ज्यापासूनि लोक नव्हती दुःखी । लोकांपासाव आपण असे सुखी । हर्ष क्रोध भय उद्वेग न घं विशेषीं । तोचि भक्त मम प्रिय ॥ १५ ॥ तरि सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुवगिजे । समु जैसा ॥ ६५ ॥ तेविं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे। आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ ६६ ॥ किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुवगे जीवां । जीवपणें जो ॥ ६७ ॥ जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें । हर्पामर्प ठेले । दुजेनविण ॥ ६८ ॥ ऐसा द्वंद्रनिर्मुक्त | भयोद्रेगरहितु । याहीवरि भक्त | माझ्या ठायीं ॥ ६९ ॥ तर तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो । हें असो जीवें जीवो । माझेनि तो ॥ १७० ॥ जो निजानंदें धाला । परिणाम आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥ ७१ ॥ विषयाच्या गोडीचें तोल करण्याला कांटा तरी कोठे मिळणार ? ६१ म्हणून अर्जुना, तुला सांगतों, कीं, तो प्रिय भक्त आणि तो प्रेमळ श्रोता तूंच आहेस; तशांत प्रियभक्ताचें वर्णन करण्याचा प्रसंगही सहज लाभला, ६२ म्हणूत बोलतां बोलतां स्वाभाविकपणे या वर्णनानंदांत मी लीन होऊन गेलों !" इतकें बोलून तत्काळ देव प्रेमानंदानें डोलूं लागले. ६३ मग ते म्हणाले, "अर्जुना, अशा ज्या भक्ताला मी आपल्या अंतःकरणांत आसन था देतों, त्या भक्ताचें लक्षण ऐक. ६४ ज्याप्रमाणं समुद्राच्या खवळण्याचें जलचरांना भय वाटत नाहीं, आणि जलचरांचा जसा समुद्राला कधीं कंटाळा येत नाहीं, ६५ त्याप्रमाणें जगाच्या माजोरीपणानें ज्याला कधीं खंत वाटत नाहीं, आणि ज्याच्यापासून जगालाही कधीं शीण होत नाहीं; ६६ इतकेंच नव्हे, तर, अर्जुना, जसें शरीर कधीं अवयवांचा तिटकारा करीत नाहीं, तसा आत्मैक्यभावानें जो कधीं जीवमात्राचा तिटकारा मानीत नाहीं, ६७ जग म्हणजे आपलाच देह, अशा भावनेनें, प्रिय व अप्रिय, हा भेद ज्याचा गेला, आणि दुजा भाव नसल्यामुळे हर्षशोकादिकांचें नांवही ज्याचे ठिकाणीं नसतें; ६८ अशा प्रकारें इंद्रबुद्धीच्या कचाट्यांतून सुटल्यामुळे जो भय, उद्वेग, इत्यादि विकारांनी अलिप्त झाला आहे, आणि शिवाय जो माझा भक्तही आहे. ६९ त्या पुरुषाचा मला मोह पडतो. त्या मोहक आवडीचें काय वर्णन करूं ? तो तर माझ्या जीवाचाच जीव आहे. १७० जो आत्मानंदाने तृत झाला आहे; केवळ स्वाभाविक परिणामानें जो जन्माला आला आहे, परंतु जो पूर्णत्वाप्रत जाऊन मला प्रिय झाला आहे. ७१