पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दुवाड जरी || २६ || तरि हेंही असो । सांडीं माझा अतिसो । परि संयतीसीं वसो । बुद्धि तुझी ॥ २७ ॥ आणि जेणें जेणें वेळे । घडती कर्मों सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजित जायें ॥ २८ ॥ वृक्ष कां वेली | लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्मे सिद्धे ॥ २९ ॥ परि मातें मनीं धरावें । कां मजउद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥ खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजी पेरिलें । कर्म मानीं देखिलें | स्वप्न जैसें ॥ ३१ ॥ अगा आत्मजेच्या विषीं । जिवु जैसा निरभिलापी । तैसा कर्मी अशेषीं । निष्कामु होईं ॥ ३२ ॥ वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजीं ॥ ३३ ॥ अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परि योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥ ३४ ॥ येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळझाडें । वांझें जैसीं ॥ ३५ ॥ तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥ ३६ ॥ पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञानें ये जे भेटी । ध्यानाचिये ॥ ३७ ॥ मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके || ३८ || कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । राहू दे. माझा ध्यास बाजूस ठेवलास तरी चालेल, पण तुझी बुद्धि इंद्रियनिग्रहाविषयीं तरी जागी राहिली पाहिजे. २६, २७ आणि मग, ज्या ज्या वेळीं जें जें कर्म घडेल, त्या सर्व कर्माच्या फळांचा तूं त्याग करीत जा. २८ ज्याप्रमाणें झाडें किंवा वेली आलेलीं फळें अखेर गाळून टाकतात, त्याचप्रमाणे सिद्धीस गेलेलीं कर्मै तूं झाडून टाकीत जा. २९ इतकेंच नव्हे, तर माझें स्मरण करावें आणि माझ्या प्रीत्यर्थ कर्मे करावीं, ही भावनासुद्धां नको. खुशाल तीं आपल्या फळांसह शून्यांत गडप होऊं दे. १३० खडकावर पडलेला पाऊस किंवा आगीत पेरलेलें बीज, यांच्यासारखेंच तूं आपलें कर्म स्वमवत् निष्फळ समज. ३१ ज्याप्रमाणें आपल्या मुलीविषयीं कोणीही विषयवासना धरीत नाहीं, त्याचप्रमाणे आपल्या सर्व कर्माविषयीं तुला निष्काम झालें पाहिजे. ३२ जशी विस्तवाची ज्वाळा आकाशांत नाहींशी होते, तशीं तुझीं सर्व कर्मों शून्यामध्यें गडप होऊं दे. ३३ अर्जुना, हा कर्मफलत्याग जरी केवळ सोपा वाटला, तरी तो सर्व योगांमध्यें श्रेष्ठ योग आहे. ३४ या फलत्यागानें ज्या ज्या कर्माचा नाश होतो, तें कर्म कधींही वाढीला लागत नाहीं. एकदा बांबूच्या बटाला बीं आलें म्हणजे जसें तें बेट नाहींसें होतें, तसें या फलत्यागामुळे सांप्रतच्या शरीराचा पात झाला, म्हणजे पुन्हां शरीरधारण करावें लागत नाहीं; इतकेंच नव्हे, तर जन्ममरणाचा फेरा अजीबाद बंद होतो. ३५, ३६ अर्जुना, अभ्यासाची पायरी चढून ज्ञानाला गांठतां येतें, आणि ज्ञानसाधनानें ध्यान गांठतां येते. ३७ मग ध्यानामध्यें सर्व वृत्ति रंगून गेल्या, कीं, सर्व कर्मसमूह आपल्यापासून विलग होतो. ३८ अशा रीतीनें कर्म दूर झालें कीं, फलत्याग आपोआप घडतो, आणि या