पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी न्याहाळीन अशेख । झुंजते जे ॥ १७० ॥ एथ आले असती आघवे । परी कवणेंसीं म्यां झुंजावें । हें रणीं लागे पहावें । म्हणऊनियां । ७१ ॥ बहुत- करूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव | वांटिवेवीण हांव । वांधिती झुंजी ॥ ७२ ॥ झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोनि रायाप्रती । काय बोले ॥ ७३ ॥ संजय उवाच - एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ २४ ॥ भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥ २५ ॥ तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् । आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा २६ श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि । तान्समीक्ष्य स कौंतेयः सर्वान्वंधूनवस्थितान् ॥ २७ ॥ सम॰—हृषीकेश गुडाकेशें प्रार्थिला जो असा नृपा । तो दो सेन्यमध्यभागीं तो स्थापूनि रथोत्तम ॥ २४ ॥ समोर भीष्मद्रोणांच्या सर्वभूपाळसन्मुख । पार्था पाहें म्हणे यांतें मिळाले जे कुरूंप्रती ॥ २५ ॥ तो पार्थ पाहे चुलते आजे जे त्यांत त्यांप्रती । गुरु मामे आणि भाऊ पुत्र पौत्र सख्यांसही ॥ २६ ॥ सास न्यासोय यांर्तेही यां दोन्हीं सैन्यसागरीं । देखोनि पुत्र कुंतीचा बंधूंनें त्या रणांगणीं ॥ २७ ॥ आर्या - ऐकुनि ऐशा वचना युद्धीं जे बोलिला गुडाकेश । दोहीं सेनेमध्ये स्थापी नेऊन रथ हृषीकेश ॥ २४ ॥ भीष्मद्रोणां संनिध सर्व नृपांच्या समीप विश्वगुरू । बोले पेसें पार्था आजि मिळाले पहा सर्व कुरु ॥२५॥ पाहे अर्जुन तेथे मातुल आचार्य पुत्रपौत्रांतें । त्या पितृपितामहांत बंधू आणि इष्टमित्रांतें ॥ २६ ॥ श्वशुरांतें सुहृदांतें तेव्हां दोन्हीहि सैन्यसिंधूर्ते । कुंतीचा तो नंदन पाहुनियां सिद्ध सर्व बंधूनें ॥ २७ ॥ ओव्या-अगा ये धृतराष्ट्रराया ! । ऐसें अर्जुन बोलोनियां । कृष्णें रथ नेऊनियां । दो सैन्यांत स्थापिला ॥ २४ ॥ भीष्म मुख्य करूनी | पृथ्वीचे राजे मिळोनी । कौरव मिळाले देखोनी । अर्जुन पाहे तयांनें ॥ २५ ॥ पार्थं सकळही देखे । पितृव्य पितामह विशेषें । आचार्य भ्रातृपुत्र अनेक । पुत्र सखे अवघेचि ॥२६॥ श्वशुर सोयरे दो सैन्यीं । बंधुवर्गात जाणोनी । कृपा उपजली मनीं । कौंतेय बोलों लागला ॥ २७ ॥ आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथ पेलिला । दोहीं सैन्यां- माजीं केला । उभा तेणें ॥ ७४ ॥ जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । वहुत आहाती ।। ७५ ।। तेथ स्थिर करूनियां रथ । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥ ७६ ॥ मग देवा म्हणे देख देख | हे गोत्रगुरु अशेख । तंव कृष्णमनीं नावेक | विस्मो जाहला ॥७७॥ तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरिलें येणें । त्यांना मी समग्रपणे जरासा अवलोकन करीन. १७० येथे सगळेच आले आहेत, पण या रणांत मी स्वतः कोणाबरोबर झुंजावं, हें पाहिलें पाहिजे. ७१ बहुतांशी हे कौरव मोठे उल्लू व दुष्ट स्वभावाचे असल्यामुळे, अंगीं पराक्रम नसतांही, युद्धाचा आव घालून आले असावे. ७२ यांना युद्धाची हौस आहे, पण युद्धाला अवश्य असणारें धैर्य मात्र यांचे अंगीं नाहीं. " असें अर्जुनाचें भाषण धृतराष्ट्राला सांगून, संजय म्हणाला ः - ७३ (6 राजा, ऐक, असें अर्जुन बोलला मात्र, तोच श्रीकृष्णांनी रथ चालविला व दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला. ७४ जेथें जवळच भीष्म, द्रोण, इत्यादि व दुसरे राजेही होते, ७५ तेथें रथ थांबवून अर्जुन तो समग्र सैन्यभार मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. ७६ नंतर तो भगवन्तांस म्हणाला, "पहा, पहा, देवा, हे तर सर्व आमचेच गोत्रज व गुरु आहेत ! " हे शब्द ऐकतांच श्रीकृष्ण क्षणक चपापले. ७७ भगवान् आपल्या मनांत म्हणाले, “याच्या मनांत काय आले आहे, कोण १ प्रेरिला, घुसवला.