पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४३३ भागीं । तैसाच असें ॥ १४ ॥ इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं । अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥ १५ ॥ कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं । मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ।। १६ ।। परि मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये । तो मी करितु आहें । ऐसें न म्हणे ॥ १७ ॥ करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मनि ॥ १८ ॥ उणेयापुरेयाचें कांहीं । उरों नेदीं आपुलिया ठायीं । सजात करूनि घेईं । जीवित्व आपुलें ॥ १९ ॥ माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतच गेलें । तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥ १२० ॥ म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति । इयें वोझीं नेघें मती । अखंड चित्तवृत्ति । माझ्याठायीं ॥ २१ ॥ न्हवीं तरी सुभटा । उजू को अव्हांटा । रथ काई खटपटा | करितु असे ।। २२ ।। आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें वह न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे | माझ्याठायीं ॥ २३ ॥ ऐसिया मद्भावना । तनुत्यागी अर्जुना । तूं सायुज्यसदना | माझिया येसी ॥ २४ ॥ अथैतदप्यशक्तोऽसि कर्तु मद्योगमाश्रितः । सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११ ॥ सम० - हेंही नव्हे तर मन जिंकीं होय मदाश्रित । सर्व कर्मफळें टाकीं फळशब्दे सुखस्पृहा ॥ ११ ॥ आर्या - हेंही जरि तुज नोहे तरि करिं माझाचि आश्रय स्वच्छ जिंकुनि मन हैं पार्था टाकावें सर्व कर्मफळ तुच्छ ॥ ११॥ ओवी - कर्महि जरी न करवे । तरी माझे पाठीं रिघावें । कर्मफळ टाकावें । सुखस्पृहा ॥ ११ ॥ ना तरी हेंही तुज । नेदवे कर्म मज | तरी गा तूं भज | पांडुकुमरा ॥ २५ ॥ बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें वांधणे किरीटी । तेथें असशील तसाच रहा. १४ इंद्रियांना आवरूं नकोस, भोगांना सोडूं नकोस, आणि आपल्या जातीचा अभिमानही टाकू नकोस. १५ कुळाचार पाळीत जा, विधिनिषेध सांभाळ; अशा प्रकारें वागण्याची तुला सरळ मोकळीक दिली आहे. १६ परंतु, मनानें, वाचेनें, व कायेनें, जें जें कर्म घडेल, तें तें ' मी करतों, ' असें म्हणूं नकोस. १७ करणें कीं न करणें, हैं तो एक विश्वचालक परमात्माच जाणतो. १८ हें कर्म उणें, हें कर्म पुरें, असें तूं आपल्या मनांत न आणतां, आपला जीवभाव आपल्या ठिकाणी एकरूप करून आपलें जीवित बालव १९ माळी पाण्याला जिकडे नेतो, तिकडे तें निवांतपणें जातें, त्याचप्रमाणें तूंही कर्तृत्वाचा अभिमान टाकून शांत राहावेंस. १२० म्हणून प्रवृत्ति आणि निवृत्ति हीं ओझीं आपल्या चित्तावर लाङ्गू नकोस, निरंतर आपली चित्तवृत्ति माझ्या ठिकाणी राख. २१ खरं पाहिलें तर, अर्जुना, वाट सरळ आहे कींवांकडी आहे याची चिंता रथ कधीं तरी करतो का ? २२ म्हणून अशा निवांतपणें जें कांहीं कर्म घडेल, अधिकउणें न म्हणतां शांतपणे मला अर्पण करीत जा. २३ अशी तुझी जर भावना झाली, तर, अर्जुना, देहपात झाल्यावर तूं मोक्षपदाला पावशील. २४ आतां, हें कर्मसमर्पणही तुला करतां येत नसेल, तर, अर्जुना, तूं माझी भक्ति कर. २५ बुद्धिसर्वस्वानं कर्माच्या आरंभीं व अंतीं माझी आठवण करणें तुला कठीण वाटत असेल, तर तेंही ५५