पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३२ 1 सार्थ श्रीज्ञानेश्वरी अथवा हैं चित्त । मनबुद्धिसहित | माझ्या हाती अचुंबित । न शकसी देवों ||४|| तरि गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं । मोटके निमिषभरी । देतु जाय ।। ५ ॥ मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक । विपयीं घेईल || ६ || जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहहूं लागे । तैसें चित्त काढल वेगें । प्रपंचानी ॥ ७ ॥ मग पुनवेहृनि जैसें । शशिविंव दिसेंदिसें । हारपत अवसे । नाहींचि होय ॥ ८ ॥ तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळू हळू पांडुसुता । मीचि होईल ॥ ९ ॥ अगा अभ्यासयोग म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥। ११० ।। पैं अभ्यासाचेनि वळें । एकां गति अंतराळें । व्याघ्र सर्प प्रांजळे | केले एक ॥। ११ ॥ विष की आहारी पडे । समुद्री पायवाट जोडे । एकीं वा थोकडें । अभ्यासें केलें ॥ १२ ॥ म्हणोनि अभ्यासास कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागिं माझ्या ठायीं । अभ्यासें मिळे ॥ १३ ॥ अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव । मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥ सम॰—अभ्यासही न करवे करीं कर्म मदर्पण । मत्कर्मै करितां ज्ञानी तूं त्या स्थितिस पावसी ॥ १० ॥ आर्या - अभ्यास न होय जरी तरि मत्प्रीत्यर्थ विहित कर्म करीं । करितां मदर्थ कर्मै पावसि तूं सिद्धि आत्मसौख्य करीं १० ओवी - अभ्यासही जरी न करवे । तरी कर्म मज समर्पावें । कर्म करितां भावें । इच्छिली सिद्धि पावसी ॥ १० ॥ कां अभ्यासाहीलागीं। कसु नाहीं तुझिया आंगीं । तरी आहासी जया आतां, जर मन व बुद्धि यांसह आपलें चित्त सर्वस्वीं माझ्या स्वाधीन करणें तुला साधत नसेल, तर तूं असें कर, दिवसाच्या आठ प्रहरांमध्ये एक अल्प क्षणभर तरी आपले चित्त मनोबुद्धिसह मला अर्पण करीत जा. ४,५ मग, ज्या ज्या क्षणाला माझें सुख भोगावयास सांपडेल, तितके क्षण तरी विषयांची नावड तुझ्या चित्तांत उत्पन्न होईल. ६ आणि, जसा शरत्काल आला म्हणजे नदी आटू लागते, तसे तुझं चित्त प्रपंचांतून वेगानें बाहेर पडेल. ७ असें झाले म्हणजे, जसें पौर्णिमेपासून चंद्राचे विव दिवसानुदिवस आटतआटत अखेर अमावास्येला अगदींच नाहींसें होतें, ८ तसें विषयोपभागांतून बाहेर पडतां पडतां आणि माझ्या स्वरूपांत प्रवेश करतां करतां, अर्जुना, हळूहळू तुझं चित्त मत्स्वरूपी होऊन जाईल. ९ अरे, ज्याला 'अभ्यासयोग' म्हणतात तो हाच होय, या अभ्यासयोगानें साधत नाहीं, असें जगांत कांहींच नाहीं. ११० अरे, या अभ्यासाच्याच सामर्थ्याने कोणी हवेंत चालतात, कोणी वाघांना व सापांना नरम आणतात, ११ कोणी विष पचवितात, तर कोणी समुद्रांत पायचालीनें जातात. या अभ्यासाच्याच बळावर कोणी वेदविद्येत पारंगत झाले आहेत. १२ म्हणून, या अभ्यासाच्या साधनाला दुर्लभ असें कांहींच नाहीं; या कारणास्तव तूं अभ्यासयोगानं माझी प्राप्ति करून घे. १३ अथवा, असा अभ्यास करण्याचेही सामर्थ्य तुझ्या अंगी नसेल, तर तूं ज्या स्थळी आहेस,