पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४३१ समुद्धर्ता | आधीं मी सदा ॥ ९४ ॥ आणि जेव्हांचि कां भक्तीं । दिधली आपुली चित्तवृत्ति । तेव्हांचि मज सूती । त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥ याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया । शिकिजे जैं यया । मार्गा भजिजे ॥९६॥ मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धि निवेशय । निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥ सम० - यालागीं मन मद्रूपीं स्वरूप बुद्धि घालुनी । मजमाजींच मग तूं प्रवेशसि न संशय ॥ ८ ॥ आर्या-ठेवीं मजवरि मन तें पार्था बुद्धीसही न दे परतुं । निःसंशय मजमाजीं प्रवेशसी पांडवा अतः पर तूं ॥ ८ ॥ ओवी - योगबळेंकरूनी । मनबुद्धि माझे ठायीं अर्पूनी । सुखी होसील मनमिळणीं । यांत संशय नसे कीं ॥ ८ ॥ अगा मानस हैं एक | माझ्या स्वरूपीं वृत्तिक । करूनि घालीं निष्टंक | बुद्धिनिश्चयेंसीं ॥ ९७ ।। इयें दोनी सरिसीं । मजमाजि प्रेमेसी । रिगाली तरी पावसी । मातें तूं गा ९८ ॥ जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्या ठायीं । तरि सांगें मग काई । मी तूं ऐसें उरे ।। ९९ ।। म्हणोनि दीप पालवे | सवेंचि तेज मालवे । कां रविविचासवें । प्रकाशु जाय ॥ १०० ॥ उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥ १ ॥ म्हणोनि माझिया स्वरूप । मनबुद्ध इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ २ ॥ यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं । आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥ ३ ॥ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥ ९ ॥ सम० - आतां चित्त स्थिर करूं शकेनासि मदंतरीं । अभ्यासे प्राप्तिची माझ्या इच्छा करिं धनंजया ॥ ९ ॥ आर्या - जरि शक्य न होय तुला मजमाज अचळ मन समाधानें । तरि तूं मज पावाया इच्छीं अभ्यास-योग- संघानें ॥९॥ ओवी - तुझिया चित्ता नये स्थिरपण । अभ्यास करीं आपण । योगाभ्यासेंकरून । पावसी धनंजया ॥ ९ ॥ तारणाला निरंतर सिद्ध असतो. ९४ आणि ज्या क्षणीं भक्तांनीं आपली चित्तवृत्ति मला अर्पण केली, त्याच क्षणी त्यांचे प्रपंचरूपी खेळ खेळण्याकरितां मला त्या खेळांत ते सामील करतात. ९५ या कारणास्तव, "जेव्हां हा अनन्य भक्तीचा मार्ग धरावा, तेव्हां जीव श्रेष्ठ भक्त होतो, " हा मंत्र, अर्जुना, तूं पाठ करून ठेवावास. ९६ अरे बुद्धीचा निश्चय करून मनाच्या सर्व वृत्ति माझ्या स्वरूपाच्या ठायीं स्थिर कर. ९७ अर्जुना, बुद्धि आणि मन हीं दोन्ही जर प्रेमानें एकदम माझ्या ठिकाणीं रममाण झालीं, तर तूं मला येऊन मिळशील; ९८ कारण, जर मन आणि बुद्धि हीं माझ्या स्वरूपांत स्थिर होऊन नांदूं लागली, तर मग ' मी तूं ' हें कोठें उरलें ? तूंच सांग पाहू. ९९ म्हणून, दिवा पदरानें वारा घालून मालवला कीं जसें त्याचं तेज जाते, किंवा सूर्यविवाचा अस्त झाल्याबरोबर प्रकाश जसा नाहींसा होतो, १०० किंवा वर येऊ लागलेल्या जीवावरोवर जशीं इंद्रियेंही शरीर सोडून जातात, तसा मन आणि बुद्धि यांच्या बरोबर ' अहंकार' ही आपसूक येऊ लागतो. १ म्हणून, माझ्या स्वरूपांत आपल्या या मनाला आणि बुद्धीला प्रविष्ट करून तेथेच स्थिर कर, म्हणजे या कृत्यानें तूं माझें सर्वव्यापक स्वरूप लाभशील. २ ह्या सिद्धांताला मुळींच अपवाद नाहीं, हें मी तुला स्वतःची शपथ वाहून सांगतो. ३