पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० ४३० सार्थ श्रीज्ञानेश्वरी तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥ सम० - ऐश चित्तें मजमधे त्यांचा मी भवसागरीं । पार्थ न लावितां वेळ होत केवळ तारक ॥ ७ ॥ आर्या-कुंतीतनया त्यांचा दुःखप्रद मृत्युयुक्त भवसिंधू । अटवूनि उद्धरीं मी नेरें त्यांलागि दीनजनबंधू ॥ ७ ॥ ओवी - मी उद्धरीं तयांसी । भवसागरी परियेसीं । चित्त माझे ठायीं नेमँसी । तारक त्यांत होतसे ॥ ७ ॥ किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । तुला पां ॥ ८३ ॥ तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां | घेतला पट्टा ॥ ८४ ॥ एहवीं तरी माझिया भक्तां । आणि संसाराची चिंता | काय समर्थांची कांता | कोरान्न मागे ॥ ८५ ॥ तैसे ते माझें । कलत्र हैं जाणिजे । कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥ जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें || ८७ ॥ भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे । तेथ जरी कीं माझे । विहिती न ॥ ८८ ॥ म्हणोनि गा पांडवा । मृतींचा मेळावा । करून त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥ ८९ ॥ नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥ ९० ॥ सडे जे देखिले । ते ध्यान कासे लाविले । परिग्रही घातले । तरियावरी ॥ ९१॥ प्रेमाची पेटी | बांधली एकाचिया पोटीं । मग आणिले तटीं । सायुज्याचिया ॥ ९२ ॥ परि भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे । वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥ ९३ ॥ म्हणोनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता । तयांतें थोडक्यात सांगावयाचें म्हणजे, अर्जुना, जो आईच्या पोटीं येतो, तो त्या आईला किती वरें प्रिय असतो ! ८३ त्याप्रमाणेच; ते भक्त जसे असतील तसेच मला प्रिय असतात; कळिकाळांना वारून त्या भक्तांचें रक्षण करण्याचा मी पट्टाच काढला आहे ! ८४ पण असें नसतें, तरीही, माझे भक्त आणि संसाराची चिंता ! काय ही असंबद्ध कल्पना ! अरे, समर्थाची आवडती स्त्री कधीं कोऱ्या अन्नाची भीक मागते काय ? ८५ त्याचप्रमाणेंच माझा भक्त माझें प्रेमपात्र आहे, मग त्याची लाज मला नाहीं कीं काय ? ८६ जन्ममृत्यूची लाट या सर्व सृष्टीवर कोसळत आहे, हें पाहून मला मनांत असें वाटलें कीं, ' या संसारसागराच्या उसळीनें कोणाची घाबरगुंडी उडत नाहीं ? तेव्हां यांत माझेही भक्त भीतील कीं काय न जाणों !” ८७,८८ म्हणून, अर्जुना, मी रामकृष्णादि रूपांनी सगुण मूर्ति धारण करून त्यांच्याजवळ धांवत आलों आहे. ८९ माझीं रामकृष्णादि नांवें या हजारों होड्याच आहेत असें समज. यांना या संसारसागरांत सज्ज करून, मी भक्तांचा तारक झालों आहे. ९० मग जे भक्त संगहीन सडेसोट होते, त्यांना मी आपल्या ध्यानाच्या कासेला लाविलें, आणि, जे संसारी होते. त्यांना मात्र या होड्यांवर बसविलें. ९१ कांहींच्या पोटाखाली प्रेमाची पेटी बांधली. अशा रीतीनं त्या सर्व भक्तांना मी आत्मैक्याच्या तटाला आणून लाविलें. ९२ इतकेंच नव्हे, तर ज्यांनी ज्यांनी भक्ति केली, त्या त्या चतुष्पादादि जनावरांनासुद्धां भक्त म्हणून वैकुंठींच्या साम्राज्याचे धनी केले. ९३ म्हणून, माझ्या भक्तांना कोणतीही चिंता जाचत नसते, मी त्यांच्या १ निवारून.