पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४२९ सूर्याची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥ यालागीं पांगुळा हेवा | नव्हे वायूसि पांडवा । तेवं देहवंतां जीवां । अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥ ऐसाही जरी विसा । बांधोनियां आकाशा | झोंवती तरी क्लेशा । पात्र होती ॥ ७४ ॥ म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोढंगले ॥ ७५ ॥ 1 ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥ सम० - मातेंहि मानुनी थोर कर्मे सर्व समर्पिती । तरी अद्वैतयोगंची मातें ध्याती उपासिती ॥ ६ ॥ आर्या-माझ्या ठायीं सर्वहि कर्मै जे अर्पुनीहि मत्पर ते । ध्याती उपासिती मज अनन्य त्यांचा न योग तो परते ॥ ६॥ ओवी - सर्व कर्म माझ्या ठायीं । अर्पिती जाणोनि माझी सोई । मज ध्याती अहर्निशीं पाहीं । माझें ध्यान सर्वदा ॥ ६ ॥ कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्मों अशेखें । जियें कां वर्णविशेखें | भागा आलीं ॥ ७६ ॥ विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥ यापरी पाहीं । अर्जुना माझे ठाईं । संन्यासूनि नाहीं । करिती कर्मे ॥ ७८ ॥ आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥ ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर | ध्यानमिपें घर । माझें झाले ॥ ८० ॥ जयाचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी । भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥ ऐसे अनन्ययोगं । विकले जीव मनें आंगें । तयांचें काइ एक सांगें । जे सर्व मी करीं ॥ ८२ ॥ सूर्यलोकाच्या पायरीवर कधीं चढतां येईल काय ? ७२ म्हणून, अर्जुना, पांगळ्यानें वान्याबरोबर चढाओढ करणें योग्य नाहीं. तोच प्रकार या निर्गुणोपासनेत शरीरधारी जीवांचा होतो. ७३ पण इतकं धिटाईचें साहस करून शून्याला झोंबण्यास जे सिद्ध होतात, त्यांना अत्यंत क्लेश सहन करावे लागतात. ७४ म्हणून ज्या दुसऱ्या योग्यांनीं भक्तिमार्गाचा अवलंबन केला, अर्जुना, ते हें दुःख कधीही अनुभवीत नाहींत. ७५ आपल्या वर्णभेदानुसार जीं कर्मे आपल्या वांट्याला आली असतील, तीं सर्व कर्मे कर्मेंद्रियें सुखाने करीत आहेत; ७६ शास्त्रोक्त कर्म करीत आहे, निषिद्ध कर्म टाळीत आहे, आणि सर्व कर्मे मला अर्पण करून त्यांचा बंधक गुण जाळून टाकीत आहे; ७७ अशा रीतीनें, अर्जुना, सर्व कर्मे माझ्याठायी आटोपून त्यांचा नाश करण्यांत येत आहे; ७८ त्याप्रमाणेंच दुसऱ्या ज्या कांहीं देहाच्या, वाचेच्या, व मनाच्या प्रवृत्ति आहेत, त्याही सर्व माझ्यावांचून दुसऱ्या कोठेही धांव घेत नाहींत ७९ अशा प्रकारे जे माझी अखंड उपासना करतात, ध्यानाच्या निमित्तानें जे माझें निरंतर निवास मंदिरच झाले आहेत; ८० ज्यांनीं आपल्या प्रेमळ गुणानें केवळ माझ्याशींच व्यवहार केला, आणि विषयभोग व मोक्षपद हीं दुर्बळ दरिद्री कुळें सोडून दिलीं; ८१ अशा एकनिष्ठ भक्तियोगाने ज्यांनी आपले जीवभाव, अंतःकरणं, व शरीरें, एकट्या माझ्या स्वाधीन केलीं आहेत, त्यांचं मी किती म्हणून वर्णन करूं ! कांकीं त्यांचे सर्वच मनोगत मला पूर्ण करावें लागतें ! ८२