पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा ४२७ काळव ॥ ४९ ॥ वज्रामीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी | व्याधीच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रं ॥ ५० ॥ मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारी केला उभा । तया चोजवले प्रभा । निमथावरी ॥ ५१ ॥ नवद्वारांचिया चौचकीं । वाणूनि संगतीची आडवंकी | उघडली खिडकी | ककारांतींची ॥ ५२ ॥ प्राणशक्तिचामुंडे | प्रहारूनि संकल्प मेंढे | मनोमहिपाचेनि मुंडें । दिली वळी ॥ ५३ ॥ चंद्रसूर्यां बुझावणी | करूनि अनाहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जितिले वेगीं ॥ ५४ ॥ मग मध्यमामध्यविवरें । तेणें कोरियें दादरें | टाकिलें चैवरें । ब्रह्मरंध्र ॥ ५५ ॥ वरी मकारांत सोपान । तें सांडोनियां गहन । काखेसूनियां गगन | भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥ ऐसे जे समबुद्धि। गिळावया सोहंसिद्धि । आंगविताति निरवधि | योगदुर्गे ॥ ५७ ॥ आपुलिया साटोवाटीं । शून्य घेती उठाउठी । तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥ ५८ ॥ वांचूनि योगाचेनि वळें । अधिक कांहीं मिळे । ऐसें नाही आगळें । कष्टचि तया ॥ ५९ ॥ क्लेशोऽधिकतर स्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥ सम० - कष्टी अधिक ते होती अव्यक्तीं चित्त योजितां । अव्यक्त गतितें देही दुःखं पावति यास्तव ॥ ५ ॥ . आर्या - अव्यक्तसक्तमन जे होताति क्लेश त्यांचिया देहीं । अव्यक्त गतीतें बा बहुत क्लेशेंचि पावती देही ॥ ५ ॥ ओंवी — कष्टेंकरून अव्यक्तीं मन नेमिती । त्यांसि क्लेशचि होती । अव्यक्ताची गती दुःखं पावती । देहवंत हे ॥ ५ ॥ भ्याडपणाचे खडक ज्यांनी फोडले आहेत, आणि अज्ञाननिद्रेचा काळोख ज्यांनीं निवळून साफ नाहींसा केला आहे; ४९ वज्रासनाच्या म्हणजे मूळबंधाच्या अग्निज्वाळांनी शरीरगत सात धातूंची होळी करून, ज्यांनीं रोगांच्या मस्तकीं षट्चक्रांच्या तोफांचा धडाका उडविला आहे, ५० मग स्फुरण पावलेल्या कुंडलिनीची तेजस्वी दिवटी आधारचक्रावर उभी करून, ज्यांनी तिच्या प्रभेनें मस्तकापर्यंत सर्व शरीरप्रदेश देदीप्यमान केला आहे; ५१ मग इंद्रियांच्या नऊ दारांना निग्रहाची खीन्ट घालून, फक्त सुषुम्ना नाडीची दिंडीच काय ती ज्यांनीं उघडी राखली आहे; ५२ प्राणवायु- शक्तिरूपी चामुंडेकरितां संकल्परूपी मेंढे कापून मनोरूपी महिषासुराच्या मुंडीचा ज्यांनी बळी दिला आहे; ५३ चंद्रसूर्य म्हणजे इडा व पिंगला या नाड्यांचे एकीकरण करून नादघोषाच्या धोरणानें सतराव्या पूर्णामृतकलेचं पाणी ज्यांनीं त्वरेनें साधलें आहे; ५४ मग मध्यमेच्या म्हणजे सुषुम्ना नाडीच्या विवररूपी कोरीव जिन्यानें ज्यांनी अखेरचें ब्रह्मरंध गांठले आहे; ५५ इतकेंच नव्हे, तर मकारांतील म्हणजे सुषुम्नेच्या विवरांतील जिना चढून जाऊन, महदाकाशाला खांकेस मारून, जे ब्रह्मांत विलीन झाले आहेत; ५६ अशा प्रकारें समबुद्धि होऊन, ज्यांनीं ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ होण्यासाठी योगाचा खडतर मार्ग आपलासा केला आहे; ५७ आणि ज्यांनीं आपल्या जीवभावाच्या मोबदल्यांत निर्गुण, निराकार, शून्यस्वरूप ब्रह्म झटपट आपल्या पदरी पाडून घेतलें आहे, तेही, अर्जुना, मलाच येऊन मिळतात. ५८ यावांचून कांहीं निराळें त्यांना योगचळानें अधिक मिळते, अशांतला मुळींच भाग नाहीं. त्यांना अधिक काय, तर कच केवळ मिळतात. ५९ १ शेवटचें.