पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२६ सार्थ श्रीानेश्वरी ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते । सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥ संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । तं प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥ सम० - क्षरेना बोलवेना त्या अव्यक्ताच उपासिती । अचिंत्य सर्वत्र लिप्त न जें अढळ शाश्वत ॥ ३ ॥ आटोपुनी इंद्रियांत सर्वत्र समबुद्धि जे । मातेंचि पावती तेही सर्वभूतहित रत ॥ ४ ॥ आर्या - अव्यक्त ध्रुव अक्षर सर्वग ज्या निर्गुणांत मनन चळ । कूटस्थ अनिर्देश्यहि उपासिती जे अचित्य आणि अचळ ॥ ३ ॥ सर्वत्र तुल्यदृष्टी इंद्रियगतिचें करोनियां दमन । सर्व प्राणिहितीं जे तत्पर पावति मलाच ते अमन ॥ ४ ॥ ओव्या - जे अक्षर अनिर्वाच्य अव्यक्त जाण । तें सर्वत्र व्यापक संपूर्ण । अंतःकरणास नित्य अगोचर जाणोन । त्याची उपासना करिती ॥ ३ ॥ इंद्रियसमूह नेमून | सव ठार्थी बुद्धि समान धरून । सर्वहित तत्पर होऊन । ते मज पावती गा अर्जुना ४ आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४० ॥ मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टि न रिगे । इंद्रियां कीर जोगें । काइ होईल ॥ ४१ ॥ परि ध्यानाही - कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न संपडे | व्यक्तीसि माजिवडें । कवणेंही नोहे ॥ ४२ ॥ जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥ जें होय ना नोहे । जें नाहीं नां आहे । ऐसें म्हणोनि उपाये । उपजतीचिना ॥ ४४ ॥ जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनीचि वळें । आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥ पैं वैराग्यमहापावकें | जाळूनि विषयांचीं कटकें | अधपलीं तव । इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥ मग संयमाची घाटी । सूनि मुरडिलीं उफराटी । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया ॥ ४७ ॥ अपानींचिया कवाडा | लावोनि आसनमुद्रा सुहाडा | मूळबंधाचा हुडा । पन्नाला ॥ ४८ ॥ आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । आणि, अर्जुना, दुसरे जे आत्मसाक्षात्कार पावतात, ते निर्गुण, अविनाशी तत्त्वाला झोंबू पहातात. ४० जेथें मनाची नांगी लागू पडत नाहीं, जेथे बुद्धीच्या किरणाचा प्रवेश होत नाहीं, तें इंद्रियांना कधीं तरी साध्य होईल काय ? ४१ इतकेंच नव्हे, तर ध्यानालाही तें सांपडत नाहीं, म्हणून, ते कोणत्याही एका ठिकाणीं हातीं लागत नाहीं किंवा ते कोणत्याही आकारामध्यें असूं शकत नाहीं. ४२ जं सर्व ठिकाणीं सर्व भावानें, सर्व काळीं असतें, पण ज्याची कल्पना करतां करतां चिंतनशक्तीही चिंताक्रांत होऊन जाते; ४३ जें होतें असें म्हणतां येत नाहीं; आणि होत नाहीं असंही म्हणतां येत नाहीं; जं आहे नाहीं, आणि नाहींही नाहीं असें; असल्यामुळे ज्याला साधण्याचा कोणताही उपाय लागू पडत नाहीं; ४४ जें चटत नाहीं कीं ढळत नाहीं, जें संपत नाहीं कीं मळल नाहीं; तेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं आहारीं आणिलें आहे; ४५ ज्यांनीं वैराग्याच्य प्रखर आगीत विषयांच्या समूहांना खाक करून, इंद्रिये तावलेल्या स्थितीत मोठ्या धैर्यानें नियन्त्रित केली आहेत; ४६ मग इंद्रियसंयमाच्या जोरावर त्या इंद्रियांना उलटी फिरवून ज्यांनीं हृदयाच्या गुहेत कोंडून टाकिलें आहे; ४७ अपानद्वार घट्ट लावून आणि नीट आसनमुद्रा ज्यांनी मूळबंधाचा बुरूज बांधला आहे; ४८ आशेचे धरबंध ज्यांनीं तोडले आहेत, साधून, १ होरपळलेला २ धैर्यानं