पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा 0 ४२५ भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥ २९ ॥ इत्यादि सवीं परी । जे भक्त तूतें श्रीहरी । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥ ३० ॥ आणि जें प्रणवापलीकडे । वैखरीयेसि जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें वस्तु ।। ३१ ।। तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देश रहित । सोहंभावें उपासित | ज्ञानिये जें ॥ ३२ ॥ तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता । कवणें यो तत्त्वता । जाणितला सांगा ॥ ३३ ॥ इया किरीटीचिया वोला । तो जगबंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥ ३४ ॥ श्रीभगवानुवाच - मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥ सम० - मन घालूनि मद्रूपीं स्वरूपीं नित्य योजले । भजती आत्मभक्तीनें ते थोर मज संमत ॥ २ ॥ आर्या – ठेवुनि मजवरि मन जे परम श्रद्धा धरोनि हे अन्य । मातें उपासिती जे ते मजला युक्ततम महामाम्य ॥ २ ॥ ओवी - माझे ठार्थी मन नेमून । श्रद्धापूर्वक करी भजन । तो भक्त मज पावे जाण । निश्चयेंसीं ॥ २ ॥ तरि अस्तु गिरीचिया उपकंठीं । रिगालिया रविविंद्यापाठीं । रश्मि जैसे किरीटी । संचरती गा ॥ ३५ ॥ कां वर्षाकाळी सरिता । जैसी चढों लागे पांडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे || ३६ || परि ठाकिलियाहि सागरु | जैसा मागीलही यावा अनिवार । तिये गंगेचिये ऐसा पडिमरु | प्रेमभावा । ॥ ३७ ॥ तैसें सर्वेद्रियांसहित । मजमाजी सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥ ३८ ॥ इयापरी जे भक्त | आपण मज देत । तेचि मी योगयुक्त | परम मानीं ॥ ३९ ॥ प्रकारें सर्व परींनीं जे भक्त तुम्हाला आपल्या जिव्हाळ्याशीं बांधून उपासीत असतात; ३० आणि, जें ॐकारापलीकडे आहे, जे स्पष्ट वाणीला अलभ्य आहे, आणि ज्याला कशाचीही उपमा देतां येत नाहीं, ३१ असें तें अविनाशी, निर्गुण, अवर्णनीय, व स्थलहीन वस्तु जे ज्ञानी जन आत्मैक्यभावानें - उपासीत असतात, ३२ अशा त्या ज्ञानयोग्यांत आणि त्या भक्तियोग्यांत खरोखर योगाचें वास्तविक ज्ञान कोणाला असतें, तें, हे अनंत प्रभो, तुम्ही मला कृपा करून सांगा. " ३३ हे अर्जुनाचे शब्द ऐकून भगवंतांना संतोष झाला, आणि ते म्हणाले, “अर्जुना, प्रश्न कसा करावा हें खरोखरच तुला फार उत्तम कळते. ३४ तर ऐक पश्चिमेकडील पर्वताच्याजवळ सूर्य आड गेला, म्हणजे अदृश्य विवाच्यामागे, अर्जुना, जसे सूर्यकिरणही संचार करीत जातात; ३५ अथवा पार्था, पावसाळा असला म्हणजे जशी नदी फुगू लागते, तशी उपासना करीत असले म्हणजे श्रद्धेला नित्य नवा नवा तजेला चढतो. ३६ परंतु नदी समुद्राजवळ येऊन ठेपली, तरी जसा मागच्या प्रवाहाच्या लोंढ्याचा जोर कायमच असतो, तसा त्या नदीच्या पुराच्या जोरासारखा, प्रेमभावाचा प्रकार आहे. ३७ त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांसकट आपल्या मनोभावांना माझ्या ठिकाणी अर्पण करून, ते रात्रंदिवस - काळ अकाळ - कांहीं न म्हणतां माझी उपासना करतात, ३८ अशा प्रकारें जे भक्त आपले सर्वस्व वाहतात, त्यांनाच मी 'परम योगयुक्त - श्रेष्ठ योगी- समजतों. ३९ ' ५४