पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय बारावा 1 जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदें | वर्पति ॥ १ ॥ विषयव्याळें मिठी । दिधलिया नुटी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥ तरि कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरि प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥ योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे | सोहंसिद्धीचे लळे | पाळिसी तूं ॥ ४ ॥ आधारशक्तीचिया अंकी | वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपलकीं । परिये देसी निजें ॥ ५ ॥ प्रत्यकज्योतीची वोवाळणी | करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥ सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लैरु गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥ म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडी " हे सद्गुरुकृपादृष्टि ! तूं शुद्ध, सुप्रसिद्ध उदार, व अखंड आनंदाचा वर्षाव करणारी आहेस. अशा तुझा मी जयजयकार करतों. १ विश्वरूपी सापांनीं दंश केल्यावर अवयव ताऊं नयेत व विषाचा वेग उतरावा, हा प्रताप तुझाच आहे. २ मग, प्रसादरसाच्या लाटा उसळीत जर तुझा पूर उचंबळून आला, तर संताप कोणाला तापवील आणि शोक कोणाला जाळील ? ३ हे गुरु- कृपादृष्टि तूं अत्यंत प्रेमळ असल्यामुळे आपल्या सेवकांची ब्रह्मानंदाची हौस पुरवितेस आणि त्यांचे आत्मसाक्षात्काराचे लाडही पूर्ण करतेस. ४ मूलाधारचक्ररूपी शक्तीच्या मांडीवर त्या शिष्य - चालकांना घेऊन तूं त्यांचं कोडकौतुकानें संगोपन करतेस आणि हृदयाकाशरूपी पाळण्यांत त्यांस ठेवून आत्मज्ञानाचे झोके देतेस. ५ त्यांच्यावरून जीवभाव ओवाळून टाकून, मन आणि प्राणवायूही त्यांना खेळण्याकरितां देतेस आणि त्यांच्या अंगावर आत्मानंदाचीं बाळ भूषणं चढवितेस. ६ सतराव्या पूर्णामृतकळेचं दूध त्यांना पाजतेस, 'अनाहत' नामक नावघोषाचं गाणें गातेस, आणि समाधि- सुखानें त्यांस शांतवून निजवितेस. ७ म्हणून सर्व साधकजनांचे संगोपन करणारी माता तूंच आहेस तुझ्या चरणापासूनच कवित्वकळा उद्भवते; यास्तव तुझी शीतळ सावली मी कधीही सोडणार १ झोंके, २ आत्मोपदेशानें. ३ जीवभावाची. ४ गीत,