पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला १७ तैसा हृदयांतें भेदि । कौरवांचिया ॥ ६२ ॥ तो गाजत जंब आइकती । तंव उभेच हियें' घालिती । एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥ ६३ ॥ अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ २० ॥ सम० -- तो धार्तराष्ट्रा रचिलें हें देखोनि कपिध्वजे । आरंभितां शस्त्रघात घेऊनि धनु पांडव ॥ २० ॥ आर्या-- वीर उभे अवघेही करावयालागिं शस्त्रसंपातें । पाहुनि अर्जुन तेव्हां हातीं घेवोन सज्ज चापातें ॥ २० ॥ ओवी - सिद्ध झाले दळभार । ते अवसरीं कपिध्वज वीर। देखोनि शस्त्रबडिवार । धनुष्य घे हातीं वहिलं ॥२०॥ तेथ बळें प्रौढी पुरते । महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दातें । आवरिलें ॥ ६४ ॥ मग सैरिसेपणें उठावले | दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥ ६५ ॥ तेथ वाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर | अनिवार का ।। ६६ ।। तें देखलिया अर्जुनें । संतोप घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ॥ ६७ ॥ तंव संग्रामीं सज जाहले । सकळ कौरव देखिले । तंव लीलाधनुष्य उचलिलें । पांडुकुमरें ।। ६८ । 1 हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । अ. उ. - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१ ॥ यावदेतान्निरीक्षऽहं योद्धुकामानवस्थितान् । कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥ २२ ॥ योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ २३ ॥ सम॰—तेव्हां पार्थ हृषीकेशा बोलिला हे महीपती । करीं माझा रथ उभा या दो सैन्यांत अच्युता ॥ २१ ॥ तों कीं जीं यांस मी पाहे जे युद्धाकारण उभे । म्यां येथे कोणकोणाशी झगडावें रणांत या ॥ २२ ॥ पान युद्धकत्यांत जे मिळाले रणांत या । दुर्बुद्धि धार्तराष्ट्रांचें इच्छिनी प्रिय जे रणीं ॥ २३ ॥ आर्या-बोले श्रीकृष्णासी अर्जुन तेव्हां करावया आजी । दोहीं सेनेमध्यें ने माझा रथाह अच्युता आजी ॥ २१ ॥ जवर अवघा दृष्टीं युद्धोत्सुक हा उभा रिपुग्राम। पाहिन विचारुनीयां करूं मी कवणा झटोन संग्राम ॥ २२ ॥ पाहिन अवघे येथे आले युद्धासि वीर लवलाहें । दुर्मति सुयोधनाच्या युद्धीं जे इच्छिती मियाला हे २३ ॥ ओव्या-अगा राया भूपती ! | अर्जुन बोले अच्युताप्रती । ' दो सैन्यांत निगुतीं । रथ माझा नेईजे ॥ २१ ॥ मी पाहेन सर्वांसी । युद्ध उत्कंठा कवणासी । मम हातें को मारविसी । या रणामध्ये केशवा ! ॥ २२ ॥ दुर्बुद्धि कौरवपती । इष्ट इच्छू आले भूपती । कोण कोण ते निगुतीं । पाहेन दृष्टीं रणीं मी ' ॥ २३॥ ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथ पेलावां । नेऊनि मध्ये घालावा । दोहीं दळां ॥ ६९ ॥ जंब मी नॉवेक । हे सकळ वीर सैनिक। फाडीत सिंह संचार करितो, त्याप्रमाणेंच वीरांची हृदयं विदारीत तो प्रतिध्वनि पसरू लागला. ६२ त्या प्रतिध्वनीची गर्जना ऐकून त्यांचीं उभ्याउभ्याच धैर्ये गळाली, आणि ते एकमेकांना 'सावध रे सावध !' म्हणून आरोळी देऊं लागले. ६३ परंतु त्यांत जे बळाने व पराक्रमानें पक्के होते, अशा कांहीं महारथी वीरांनी सैन्य कसेबसें पुन्हा थायरले ६४ नंतर त्यांनी एकजुटीने उठाव केला व दुप्पट आवेशाने चाल केली. या सैन्यामुळे त्रिभुवन संत्रस्त होऊन गेले. ६५ प्रन्यकाळच्या अनावर मेघांप्रमाणे धनुर्धरांनी संतत बाणवृष्टि आरंभिली. ६६ तें पाहून अर्जुनाला फार संतोष झाला व मग त्याने मोठ्या उत्सुकतेनें त्या सेनेवर नजर टाकली. ६७ तेव्हां त्याच्या दृस युद्धाला सज्ज झालेले सर्व कौरव पडले, आणि त्या पांडुकुमार अर्जुनानेही आपले धनुष्य हलकेंच उचलले. ६८ मग त्या वेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, “देवा, आतां रथ लवकर चालवून दोन्ही सेनांच्या मध्ये न्यावा, ६९ अशाकरितां, कीं, येथे झुंज करण्यासाठी जे हे सर्व शूर योद्धे आले आहेत, १ हृदये, वक्षःस्थळे, २ जुटीनें, तयारीने ३ हांकलावा, दौडावा. ४ क्षणभर. ३