पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ४२१ मानु न कीजेचि देवें । जे व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥ ३ ॥ हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ति शाङ्गीं । दाविता जाहला ॥ ४ ॥ तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरि होय बरखें दोहीं आंतु । तें पुढती पुसों ॥ ५ ॥ ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुमती वो बरवी । आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥ ६ ॥ प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७ ॥ भरूनि सद्भावाचिया अंजुळी | मियां वोंवियाफुलें मोकळीं । अर्पिलीं अंत्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ।। ७०८ ॥ कारण विश्वरूप हें व्यापक आहे, आणि कृष्णमूर्ति ही एकदेशी, म्हणजे दिक्कालादिकांनीं मर्यादित आहे. ३ याची सिद्धता करण्यासाठीं श्रीकृष्णांनीं एकदोन चांगलीं उदाहरणं देऊन विषयाची फोड केली. ४ तें स्पष्टीकरण ऐकून सुभद्रापति अर्जुन मनांत म्हणूं लागला, कीं, " या दोन्ही स्वरूपांत खरोखरच कोणतें अधिक चांगलें हें आतां पुनः विचारीन. "५ असें मनांत संकल्पून त्यानें ही गोष्ट कशा युक्तीनें विचारली, ती कथा श्रोत्यांनी पुढील अध्यायांत ऐकावी. ६ साध्या, सोप्या, ओवीछंदाने ही कथा मी मोठ्या कौतुकानं सांगणार आहे, तरी ती श्रोत्यांनी आनंदानें श्रवण करावी, असें या ज्ञानदेवाचे मागणें आहे. ७ प्रेमाच्या ओंजळींत हीं ओव्यांचीं सुटीं फुलें घेऊन, तीं मीं प्रभूच्या विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केलीं आहेत. ७०८ १ रामजुतीकरिता दिलेले दाखले. २ विचार, संकल्प, बेत. ३ विचारण्याची पद्धति.